भारतीय इंजिनियरनं लँडर ‘विक्रम’ला चंद्राच्या पृष्ठभागावर शोधलं ! नव्या छायाचित्रांनी केलं ‘हैराण’

चेन्नई : वृत्त संस्था – मिशन चांद्रयान2 ला एक वर्ष झाले आहे. मागच्या वर्षी हे मिशन संपूर्ण जगात चर्चेचा विषय झाले होते. एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा चांद्रयान 2 च्या विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान बाबत अजूनही प्रयत्न जारी आहेत. चांद्रयान मिशनला अनेक शास्त्रज्ञ 90 ते 95 टक्के यशस्वी झाल्याचे म्हणत आहेत. तर अनेकांनी यास अयशस्वी मिशन असेही म्हटले आहे. परंतु, इस्त्रो अजूनही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.

चेन्नईत राहणारा इंजिनियर शनमुगा गुप्ता सुब्रमण्यमने नासाची छायाचित्र पाहिल्यानंतर लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्ठ भागावर शोधले आहे. शनमुगा सुब्रमण्यमने चांद्रयान 2 ची एलआरओच्या नव्या छायाचित्रांना पाहून रोवर प्रज्ञानबाबत एक माहिती शेयर केली आहे.

शनमुगाने विऑनसोबत चर्चा करताना म्हटले, विक्रमचे लँडिंग योग्य पद्धतीने झाले नसले तरी, रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले होते. मात्र, त्यांने हेदेखील म्हटले की, याची खात्री इस्त्रो आणि नासा करतील. शनमुगा सुब्रमण्यमने म्हटले की, चार जानेवारीला एक फोटो घेण्यात आला होता, ज्यावर त्याने अभ्यास केला. नासाच्या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावर काही तरी वेगळे दिसत आहे. त्याने म्हटले की, नवीन फोटोत काही गोष्टी अशा दिसत आहेत ज्या विक्रम लँडरपासून दूर आहेत आणि असे दृश्य अगोदर नव्हते.

शनमुगा सुब्रमण्यमचे म्हणणे आहे की, ते अन्य काही नसून लँडर विक्रमच्या आतील रोव्हर प्रज्ञान होते. त्याने म्हटले की, मलब्याशिवाय प्रथमच अशाप्रकाच्या वस्तू दिसल्या आहेत. शनमुगा सुब्रमण्यमनुसार विक्रम लँडर चंद्राच्या ज्या भागात लँड करणार होते, तेथे प्रकाश खुप कमी असतो. एलआरओकडून जारी फोटोत सूर्याचा एँगल वेगळा होता, ज्यामुळे रोव्हर प्रज्ञान दिसला नाही. परंतु, जानेवारी महिन्यात प्रकाश पूर्वीपेक्षा जास्त आणि चांगला होता.

शनमुगाने म्हटले की, रिफ्लेक्शनमुळे यावेळी रोव्हर प्रज्ञान दिसून आला. सध्या, याची माहिती इस्त्रो आणि नासाला देण्यात आली आहे. आता या प्रकरणात दोन्ही संस्था काय करतात, याची प्रतिक्षा आहे. जर असे खरेच असेल तर नक्कीच भारतासाठी गर्वाची बाब आहे. शनमुगाने आपल्या ट्विटमध्ये फोटोतील ते दृश्य सुद्धा शेयर केला आहे, जे अगोदर दिसत नव्हते. आता हे पहावे लागेल की, शनमुगाच्या या माहितीवर इस्त्रो आणि नासा काय म्हणतात.

शनमुगाने म्हटले की, ज्याप्रकारे त्यामध्ये प्रोग्राम केला गेला असेल, त्यानुसार नंतर तो विक्रमच्या बाहेर पडून काही अंतर गेला असेल. फोटोत रोव्हर आणि विक्रममध्ये ट्रॅक दिसत आहे. या सर्व गोष्टींचा खुलासा इस्त्रो आणि नासाच करू शकतात. परंतु, शनमुगा सुब्रमण्यमच्या दाव्यामुळे रोव्हर प्रज्ञान बाबत नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. चांद्रयान 2 च्या रोव्हरबाबत इस्त्रोचे चेयरमन डॉक्टर के. सिवन यांना इमेल सुद्धा विऑनकडे पाठवण्यात आला आहे. त्यांनी मेलद्वारे सांगितले आहे की, आम्ही हे फोटो एक्सपर्टना दिले आहेत, ते याचे विश्लेषण करतील.