जुन्याच सायकल ‘शेरिंग’ सेवेचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते नव्याने उदघाटन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, नगरसेविका शितल काटे व पिंपळे-सौदागर परिसरातील १५ सोसायटीतील पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘स्मार्ट सायकल शेरिंग सेवा’, पीईडीएल’ या योजनेचा नव्याने उद्या पालिकेच्या वतीने उदघाटन सोहळा होणार आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b5ef6eb2-a869-11e8-b92a-f553df5947d2′]

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (PCSCL) व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे-सौदागर व पिंपळे गुरव येथे “सार्वजनिक सायकल सुविधा” (public bicycle sharing) असे नाव दिलेल्या या योजनेचे २६ आॅगष्ट २०१८ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे जुन्याच योजनेचा नव्याने प्रकल्प राबविण्याचा घाट पिंपरी-चिंचवड सत्ताधारी भाजपकडून केला जात असल्याचा आरोप नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.

काटे पुढे म्हणाले की, पर्यावरण व आरोग्याला अनुकूल अशी सेवा पिंपळे सौदागर परिसरातील १५ पेक्षा अधिक सोसायटीत मागील वर्षी झूमकार कंपनीने ‘स्मार्ट सायकल शेरिंग सेवा’, पीईडीएल ‘या नावाने प्रकल्प राबविला होता. यात सायकलसाठी तासाला २/- प्रमाणे ‘पीईडीएल’च्या समर्पित’ स्टेशन ‘वरून नागरिक सायकल वापर करत होते. त्यामुळे परिसरात फिरण्यासाठी व कमी प्रदूषण, कमी ट्रॅफिक जाम आणि सर्वात महत्वाचे चांगले जीवनदायी असा प्रकल्प सुरु होता. मात्र पालिकेच्या वतीने सर्व परिसरातील सायकली काढून घेतल्या आणि काही कालावधीनंतर १० रु प्रति तास दराने हाच प्रकल्प पुन्हा रिलाॅंन्च होत आहे.
[amazon_link asins=’B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c14b2614-a869-11e8-869e-072d44c8504a’]

या प्रकरणात जास्त दराने व जुनाच प्रकल्प पुन्हा राबविण्यात सत्ताधारी भाजपकडून ‘स्मार्ट कामापेंक्षा’ ‘स्मार्ट प्रसिद्धीचा’ खटाटोप जास्त होताना दिसत आहे. पिंपळे सौदागर परिसरात एकाच योजनेचे दुसऱ्यांदा उदघाटन होणार आहे. दोघांनी एकाच योजनेला वेगवेगळी नावे दिले आहेत.

इतर बातम्या

डिजिटल इंडियानं पोटं भरणार नाही : उद्धव ठाकरे
—————-
आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल