भाजप खासदाराच्या ‘जात’ प्रमाणपत्राच्या प्रकरणाला वेगळे ‘वळण’, धक्कादायक ‘माहिती’ आली समोर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत आता वेगळीच माहिती समोर आली आहे. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

जात वैधता पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेस्वर महास्वामी यांचे जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसांत तक्रार झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला आहे असा अर्ज 14 तारखेला पोलिसांत खासदारांच्या नावाने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारीला या प्रकरणावर अंतिम सुनावणी पार पडली. त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती.
काय आहे प्रकरण ?

महास्वामी यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना पराभूत करून महास्वामी विजयी झाले होते. त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने लिंगायत समाजातील आदरणीय गुरु असणाऱ्या महास्वामींना मोठा धक्का बसला. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणात महास्वामी यांनी पुरावा म्हणून दिलेला दाखला संशयास्पद असल्याचे जात पडताळणी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले.

You might also like