New Jeevan Anand Policy या विशेष पॉलिसीत दररोज फक्त 74 रुपये देऊन मिळवा 10 लाख, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  एलआयसीची न्यू जीवन आनंद पॉलिसी (New Jeevan Anand Policy) ग्राहकांना बचतीची संधी देते, शिवाय सुरक्षा सुद्धा उपलब्ध करून देते. या स्कीम अंतर्गत बोनस (Bonus) सुद्धा मिळतो. योजनेत रिस्क कव्हर (Risk Cover) पॉलिसी कालावधीनंतर सुद्धा जारी राहते. यामध्ये केवळ 74 रुपये रोज म्हणजे 2,220 रुपये दर महिना द्यावे लागतील. New Jeevan Anand Policy get 10 lakh rupees on maturity by paying only 74 rupees daily check details and process

18-50 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात स्कीम ही पॉलिसी 18 ते 50 वयोगटातील लोकांना घेता येते.
किमान 1 लाख रुपयाचे सम अ‍ॅश्युअर्ड (Sum Assured) घेणे आवश्यक आहे. सम अ‍ॅश्युअर्डची कमाल मर्यादा नाही.

पॉलिसीचा कालावधी आणि पेमेंटची पद्धत

न्यू जीवन आनंद प्लानसाठी कालावधी (Policy Term) 15 ते 35 वर्ष आहे.
ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे ही पॉलिसी खरेदी करता येते.
पॉलिसीसाठी वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारवर प्रीमियम (Premium) भरता येईल. पॉलिसीच्या 3 वर्षानंतर पॉलिसीवर कर्ज (Loan on Insurance Policy) घेऊ शकता.
मॅच्युरिटीवर सम अ‍ॅश्युअर्डसह सिंपल रिव्हर्सनरी बोनस (Simple Reversionary Bonus) आणि फायनल अ‍ॅडिशनल बोनस (Additional Bonus) चा लाभ मिळेल.

मॅच्युरिटीवर असे मिळतील 10 लाख रुपये

सम अ‍ॅश्युअर्ड + सिम्पल रिव्हर्सनरी बोनस + फायनल अ‍ॅडिशनल बोनस

5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख

– 21 वर्ष पूर्ण झाल्यावर जर पॉलिसीधारक जिवंत असेल तर त्यास 10 लाखपेक्षा जास्त मिळतात.

मॅच्युरिटीवर झाली डेथ तर मिळतील 5 लाख

पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर विमित व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीला सम अ‍ॅश्युअर्ड म्हणजे 5 लाख रुपये मिळतील.
जर काही कारणामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या दरम्यानच झाला तर नॉमिनीला विमा रक्कमेच्या 125 टक्के रक्कम मिळेल.
यासोबतच बोनस आणि अंतिम बोनस सुद्धा मिळतो.
जर पॉलिसीत 17 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर डेथ झाली तर या तीनपैकी जे जास्त असेल ते नॉमिनीला मिळेल.

 – सम अ‍ॅश्युअर्डच्या 125% = 5 लाख का 125% = 6,25,000

  वार्षिक प्रीमियमच्या 10 पट = (27010 चे 10 पट) = 3,02,730

  मृत्युपर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या 105% = (27010 * 17) चे 105% = 4,82,128

यामध्ये पहिल्या ऑपशनमध्ये रक्कम जास्त आहे तर तीच मिळेल.

न्यू जीवन आनंद वर मिळतात टॅक्स बेनिफिट्स

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टचे कलम-80सी च्या अंतर्गत प्रीमियम पेमेंटसाठी टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळतो. मॅच्युरिटी किंवा मृत्युच्या वेळी मिळणार्‍या रक्कमेवर सुद्धा कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

Web Title : New Jeevan Anand Policy get 10 lakh rupees on maturity by paying only 74 rupees daily check details and process

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri News | ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) तर्फे केलेल्या कारवाईच्या मागणीला यश

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या पत्नीला देखील ED ने बजावलं समन्स

MLA Amol Mitkari | आ. मिटकरींचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले – ‘ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका’