‘या’ घटनेमुळे पडला न्यू जर्सीत पैशांचा पाऊस. 

न्यू जर्सी  :वृत्तसंस्था – कोणताही माणूस असो पैशावर प्रेम नाही असे कोणीही सापडणार नाही  सगळ्यांच  पैशावर प्रेम असते . आणि जर पाऊसपैशांचा असेल तर पैसे गोळा करणाऱ्यांची संख्याही  कमी सापडणार नाही. पैशाचा पाऊस हे फक्त आपल्या बोलण्यात येते पण हा प्रत्यक्ष अनुभव न्यू जर्सीच्या नागरिकांनी घेतला  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मेटलाइफ स्टेडियमजवळ एका रस्त्यावर अजिब घटना घडली. या रस्त्यावरुन जाताना एका ट्रकमधून पैशांचा अक्षरश: पाऊस झाला. म्हणजे या ट्रकमधून चक्क डॉलर उडायला लागले. मग काय…रस्त्यावरील लोकं गाड्या थांबवून थांबवून डॉलर वेचू लागले. आश्चर्य म्हणजे या लोकांनी त्यांच्या गाड्या रस्त्यातच उभ्या केल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. रदरफोर्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. त्यावेळी या मार्गावरुन डॉलरने भरलेला एक ट्रक गेला होता.

या घटने नंतर  पोलिसांनी लोकांना विनंती केली आहे की, ज्यांनी येथून पैसे नेले त्यांनी परत आणून द्यावेत. डिटेक्टिव माईक यांनी प्रसारमाध्यमाला सांगितले की, ‘आम्ही कुणावरही कोणतीही कारवाई करणार नाहीत. फक्त ते पैसे परत मिळावे हाच उद्देश आहे’.पोलिसांनी माहिती दिली की, ट्रकच्या दरवाज्याच्या लॉकमध्ये काही अडचण होती. त्यामुळे ट्रकमधून पैसे खाली पडले.त्यांनी  हेही सांगितले  की, आम्हाला हे माहीत नाही की, ट्रकमध्ये किती पैसे होते’.