अमेरिकन तरूणाला मिळाले नवीन जीवन, डॉक्टरांनी लावला दुसरा चेहरा आणि दोन्ही हात

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एनवाययू लॅनगोन हेल्थमध्ये झालेली सर्जरी यशस्वी मानली जात होती. परंतु असे म्हणण्यासाठी काही काळ वाट पाहणे आवश्यक होते. अमेरिकन ट्रान्सप्लांट सिस्टम पाहणारी संस्था युनायटेड नेटवर्क फॉर ऑर्गन शेयरिंग (युएनओएस) च्यानुसार जगभरातील सर्जनने किमान 18 फेस ट्रान्सप्लांट आणि 35 हँड ट्रान्सप्लांट केले आहेत. परंतु, एकावेळी फेस आणि दोन्ही हातांचे ट्रान्सप्लांट खुप दुर्मिळ आहे. असे अगोदर दोन वेळा झाले आहे.

असे ऑपरेशन सर्वप्रथम 2009 मध्ये पॅरिसमध्ये एका रूग्णाचे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु तो रूग्ण एक महिन्यानंतर समोर आलेल्या समस्यांमुळे मरण पावला होता. यानंतर 2011 मध्ये बोस्टनच्या डॉक्टरांनी एका महिलेचे अशाप्रकारचे ऑपरेशन केले होते. तिला चिंपाझीने दुखापत केली होती. परंतु, काही दिवसानंतर त्यांना महिलेचे ट्रान्सप्लांट केलेले हात काढावे लागले होते.

न्यू जर्सीच्या जो डीमियो यास आता आयुष्यभर उपचार करावा लागेल. जेणेकरून त्याचे शरीर, ट्रान्सप्लांट करण्यात आलेला चेहरा आणि हाताला नाकारू नये. यासोबतच त्यांना या गोष्टीचे सुद्धा प्रशिक्षण मिळेल की, त्यांना कशाप्रकारे नवा चेहरा आणि हाताचा वापर करायचा आहे. 2018 मध्ये जो डीमियो एका ड्रग कंपनीत प्रॉडक्ट टेस्टर होते. एक दिवस झालेल्या दुर्घटनेत त्यांचे शरीर जळले होते. यानंतर ते अनेक महिने हॉस्पिटलमध्ये राहिले आणि त्यांची अनेक ऑपरेशन झाली.

परंतु, जेव्हा डॉक्टरांना वाटले की, पारंपारिक सर्जरीने जो डीमियो ठिक होणार नाहीत, तेव्हा त्यांनी 2019 च्या सुरुवातीपासून डीमियो यांची ट्रान्सप्लांट सर्जरी करण्याची तयारी केली. यासाठी एक डोनर हवा होता. डॉक्टरांना अंदाज होता की, डीमियोकडे केवळ 6 टक्केच चान्सेस आहेत की, त्यांना त्यांच्या इम्यून सिस्टम प्रमाणे मॅच मिळेल. मात्र, ऑगस्ट 2020 मध्ये डॉक्टरांच्या टीमला डेलावेरमध्ये एक डोनर सापडला आणि डीमियो यांचे कठिण ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर भिती होती की, डीमियो यांचे शरीर नवीन चेहरा आणि हात नाकारू शकते. परंतु असे झाले नाही. त्यांच्या शरीरात असे कोणतेही संकेत सापडले नाही.