पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विलास चव्हाण नावाचा आणखी एक ‘दुवा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची उकल करण्यात अदयाप पोलिसांना यश मिळालं नाही. तर दुसरीकडे या प्रकरणात ज्या मंत्रांचे नाव घेण्यात आलं आहे ते संजय राठोड १३ दिवस झाले तरी अज्ञातवासात आहेत. त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही, त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढत चाललं आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामध्ये अरुण राठोड नामक व्यक्तीचे नाव समोर आल. या प्रकरणात तो एक महत्त्वाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान या क्लिप मध्ये आणखी एक नाव आहे ते म्हणजे विलास चव्हाण. एका क्लीपमध्ये विलास चव्हाण आणि कथित मंत्री यांचा संवाद सुरु असल्याचे समजते. पुण्यात ज्या इमारतीत पूजा राहत होती त्यामध्ये अरुण राठोड, विलास चव्हाणही राहत होता. तेथील आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार विलास हा पूजाचा चुलतभाऊ आहे. त्यामुळे आता विलास चव्हाण कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या जेमतेम एक महिना आधी विलास चव्हाणला वनविभागातील सामाजिक वनीकरण विभागात शिपाईपदावर नोकरी लागली होती. विलासची कार्यालयीन वर्तवणूक चांगली होती. कंत्राटदार कंपनीकडून त्याची नेमणूक करण्यात आली होती. अरूण राठोड हादेखील वनविभागात कामाला होता.

दरम्यान या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता विलास चव्हाण याच नाव समोर आलं आहे. तो पूजाचा चुलत भाऊ असलीच सांगितलं जात आहे. जर तसे असेल तर बहिणीच्या आत्महत्येनंतर तो समोर का आला नाही. विलास चव्हाणची पोलिसांनी चौकशी केली का? अरूण राठोड आणि कथित मंत्री यांच्यासोबत आणखी एक आवाज कोणाचा? हे पोलिसांनी शोधणं गरजेचे आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ
६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला सोडूनही देण्यात आले. दाखल झालेली तरुणी नेमकी कोण आहे हे अदयाप स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. तसेच तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोण असं प्रश्न समोर आला आहे. पोलीस सध्या या डॉक्टरच शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुरीकडे रजेवर असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख १६ फेब्रुवारीला सेवेत दाखल झाल्या. मात्र त्यांनतर त्या दिसल्या नाहीत. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून कोणीही अधिकृत बोलण्यास तयार नाही.

पूजा चव्हाण भाजपची पदाधिकारी
सोशल मीडियावर पूजा चव्हाण ऍक्टिव्ह होती. तिचे अनेक फॉलोवर होते. पोलिसांनी तिच्या सोशल मीडियावर असणाऱ्या सर्व अकाऊंटची तपासणी केली. त्यामध्ये पूजाचं फेसबुक अकाऊंट सर्च केलं असता ती भाजपाच्या बंजारा युवती आघाडीची पदाधिकारी असल्याचं दिसून येतं, तसेच बीड लोकसभा निवडणुकीत खासदार प्रितम मुंडे यांच्यासोबत प्रचार करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे पूजा ही भाजपाची कार्यकर्ता होती हे दिसून येते.

कोण आहे पूजा चव्हाण?
बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी. परळीत तिचे आई-वडील राहतात. पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहेत, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती. फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते. इंग्लिश स्पिकिंगच्या क्लासेससाठी १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी मारली होती त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती.