Lockdown : ‘कोरोना’मुळे देशात 4 मे पासून लागू होणार नव्या गाइडलाइन्स, काही जिल्ह्यांना सुट मिळण्याची शक्यता

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामुळे दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाउन 3 मे ला संपणार आहे. त्यापार्श्वभूमीवर 4 मे पासून नव्या गाइडलाइन्स लागू केल्या जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली, 4 मे पासून काही जिल्ह्यांमध्ये सशर्त सुटही देण्यात येणार असून पुढील काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयानं लॉकडाउन संदर्भातील आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.. देशात लॉकडाउन राबवल्यामुळे परिस्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. या सुधारलेल्या परिस्थितीवर कोणाताही परिणाम होऊ नये यासाठी 4 मे पासून नव्या गाइडलाइन्स जारी केल्या जातील. जिल्ह्यांमधील परिस्थितीच्या आधारावर त्या ठिकाणी सुट दिली जाईल. येत्या दिवसांमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात येईल, अशा आशयाचे ट्विट केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यालयानं लॉकडाउनमुळे देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. त्या सर्वांना आपापल्या घरी जाता येणार असून त्यासंबंधीही गृहमंत्रालयाने आदेश जारी केला होता.

हा आहे आदेश

1) सर्व राज्यांनी नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करणे गरजेचे असून अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे.

2) जर एखाद्या ग्रुपला एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करायचा असे तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर संमती आवश्यक आहे.

3) प्रवास करणार्‍या व्यक्तीचे स्क्रिनिंग केले जावे. ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी.

4) प्रवासासाठी बसचा वापर केला जावा. या बसेसचे निर्जुंतीकरण करणे बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.

5) इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचार्‍यांनी तपासणी करावी. त्यांना होम क्वारंटाइन करावे.