नियम व अटींचं पालन करत ‘या’ मराठी सिनेमाची शुटींग पूर्ण !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तब्बल 3 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता सरकारनं घालून दिलेल्या नियमात सिनेमाची आणि मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. खास बात अशी की, एका मराठी सिनेमाची शुटींग पूर्ण झाली असून लवकरच आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता प्रथमेश परब याची प्रमुख भूमिका असलेला डॉक्टर डॉक्टर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमातील एका गाण्याची शुटींग बाकी होती. सरकारनं घालून दिलेल्या नियमावलीचं पालन करत आता गाण्याची शुटींग पूर्ण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गाण्याची शुटींग तशीच पेंडिंग होती.

डॉक्टर डॉक्टर या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर यात एक वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. या सिनेमात अमोल कागणे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, विद्यान माने असे अनेक कलाकार काम करताना दिसणार आहेत.

सिनेमाचं डायेरक्शन प्रितम पाटीलनं केलं आहे. याशिवाय सिनेमाची निर्मिती सागर पाठक, सुरज दगडे-पाटील, किरण कुमावत यांनी केली आहे. अमोल कागणेनं देखील सिनेमात सहयोगी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे. आता सिनेमा रिलीजसाठी तयार आहे.