खुशखबर ! मोबाईल नंबर पोर्ट करणं आणखी ‘स्वस्त’, लागणार फक्त 5.74 रूपये, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोबाईल नंबर एका ऑपरेटर वरुन दुसऱ्या ऑपरेटरवर पोर्ट करणे आता पुन्हा स्वस्त होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने दूरसंचार मोबाईल नंबर पोर्टबिलीवरील पोर्ट ट्रांझॅक्शन शुल्क आणि डिपींग शुल्क दुरुस्ती २०१९ चा मसुदा जारी केला आहे. येत्या २३ ऑगस्टपर्यंत भागधारकांना याबाबत सुचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. जर सर्व काही ठिक असेल तर ३० सप्टेंबरपासून ही सेवा स्वस्त होणार आहे.

ट्रायने जारी केलेल्या नव्या मसुद्यात मोबाईल नंबर पोर्टिबिलीटी (एमएनपी) शुल्क १९ रुपयांवरुन कमी करुन पाच रुपये चौऱ्याहत्तर पैसे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ट्रायने ३१ जानेवारी २०१८ रोजी एमएनपी शुल्क १९ रुपयांवरुन ४ रुपये केल्यावर दुरसंचार ऑपरेटर दिल्ली उच्च न्यायालयात गेले होते. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रायचा हा नियम फेटाळला होता. त्यानंतरही दूरसंचार ऑपरेटर एमएनपीसाठी १९ रुपये शुल्क आकारत होते. आता पुन्हा ग्राहकांच्या फायद्यासाठी ट्रायने एमएनपी शुल्क १९ रुपयांवरुन पाच रुपये चौऱ्याहत्तर पैसे निश्चित करण्याचा मसुदा तयार केला आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी एमएनपी सेवा सुरु केली आहे. या सेवेंतर्गत कोणताही ग्राहक त्याचा नंबर न बदलाता ऑपरेटर बदलू शकतो. या सेवेसाठी ग्राहकांना सुरवातीला १९ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मोबाईल नंबर एका ऑपरेटरवरुन दुसऱ्या ऑपरेटरवर पोर्ट करण्यासाठी ग्राहकाला त्याच्या मेसेज बॉक्स मध्ये PORT टाइप करुन तो १९०० या क्रमांकावर पाठवावा लागतो. हा नंबर पोर्ट होण्यासाठी चार ते सात दिवसांचा कालावधी लागतो.

आरोग्यविषयक वृत्त –