नव्या महिन्याची सुरुवात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने; जाणून घ्या आज काय आहेत इंधनाचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मे महिन्यात १५ हून अधिक दिवस पेट्रोल डिझेल(petrol and diesel)च्या दरात वाढ केल्यानंतर आता जून महिन्याची सुरुवातही पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात आज पेट्रोलचा दर १००.४० रुपये लिटर झाला आहे. डिझेलच्या दरात प्रति लिटर २४ पैशांनी वाढ झाली आहे. आता पुण्यात डिझेलचा दर ९०.९५ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलमध्ये २५ पैशांनी वाढ झाली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर  १०४.०८ रुपये झाला आहे.

पेट्रोल डिझेलमधून तेल कंपन्या मोठ्या प्रमाणावर नफा कमवत असतात. त्याचवेळी केंद्र सरकार आणि राज्य शासनही कराद्वारे सर्वाधिक रक्कम या इंधनातून कमावत असते. जेव्हा तुम्ही एक लिटर पेट्रोल भरता तेव्हा तुम्ही दिलेल्या शंभर रुपयांपैकी ६० रुपये तुम्ही केंद्र व राज्य सरकारला टॅक्स म्हणून देत असतात. त्याचवेळी एक लिटर डिझेल खरेदी करता तेव्हा ५७ रुपये टॅक्स भरत असतात.

पेट्रोलची मुळ किंमत – ३६.११ रुपये
एक्साईज ड्युटी – ३२.९० रुपये
राज्य व्हॅट – १७.२५
राज्य सेस – १०.१२
डिलरचे कमिशन – ३.०७
वाहतूक व इतर खर्च – ०.७० रुपये

एकूण किंमत १००.१५ रुपये

डिझेलचे पुण्यातील दर असा होतो
मुळ किंमत – ३८.५५ रुपये
एक्साईज ड्युटी – ३१.८०
राज्य व्हॅट –  १४.७८
राज्य सेस – ३.००
डिलर कमिशन – २.५८

एकूण किंमत – ९०.७१ रुपये

 

READ ALSO THIS :

 

Black Fungus : कोरोनातून रिकव्हरीनंतर सुद्धा होऊ शकतो ब्लॅक फंगसचा धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या

घरगुती LPG गॅस सिलेंडर आज ‘स्वस्त’ झाला की ‘महाग’; जाणून घ्या 1 जूनचे दर

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक