‘वाहन’ अडवल्यास ‘चावी’ काढून घेण्याचा पोलिसांना आधिकार नाही, जाणून घ्या ‘नियम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संशोधित मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर आता वाहतूक पोलीस चौकाचौकात उभे असल्याचे दिसत आहे. परंतू वाहन चालकांकडून तक्रार करण्यात येत आहे की, वाहतूक पोलीस गैरव्यवहार करत आहेत. तर अनेक वाहन चालक वाहतूक नियम मोडल्यास पोलिसांनी पकडल्यास पोलिसांवर दादागिरी करताना दिसत आहे. सोशल मिडियावर सध्या हे व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाहतूक पोलीस वाहन पकडल्यावर पहिल्यांदा वाहनाची चावी काढतात, त्यामुळे रस्त्यावर अनेकदा वाद होताना दिसतात. परंतू वाहतूक पोलिसांना चावी काढण्याचा आधिकार नाही, असे करुन ते कायदा मोडत असतात.

व्हिडिओ शूट करा –
सर्वोच्च न्यायालयाचे वकील पद्मश्री ब्रह्मदत्त यांच्या मते मोटर वाहन कायदा कोणत्याही वाहतूक पोलिसांला गाडीची चावी काढून घेण्याचा आधिकार देत नाही. ना की गाडीची हवा काढण्याचा. कायद्यात अशी तरतूद नाही की कोणत्याही वाहन चालकांशी गैरव्यवहार करणे. एखादा पोलीस कर्मचारी तुम्हाला आडवण्याचा इशारा करत असेल तर तुम्ही थांबा, परंतू चावी काढील किंवा हवा काढली तर त्याचा व्हिडिओ शूट करा आणि तो पुरावा म्हणून त्या कर्मचाऱ्यांच्या उच्चाधिकाऱ्याला दाखवा, त्या कर्मचाऱ्यावर विभागीय कारवाई होईल.

जर उच्चाधिकारी देखील त्या कर्मचाऱ्यांना मिळाला असेल तर त्या विरोधात उच्च न्यायालयात जा, जर तुम्ही BPL लाभार्थी असाल किंवा महिला किंवा अपंग असाल तर तुम्हाला मोफत कायदेशीर सहायत्ता मिळेल. त्या पोलीस कर्मचाऱ्यावर नागरिक आणि मानव आधिकार हनन केल्याची तक्रार करा. या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांला सस्पेंड देखील केले जाऊ शकते.

पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की, त्यांना हा कायदा गुंडागर्दी किंवा दादागिरी करण्याचा आधिकार देत नाही. ते फक्त दंड ठोठावू शकता किंवा गाडी ताब्यात घेऊ शकतात.
पद्मश्री ब्रह्मदत्त यांच्या मते या कायद्याचे पालन करणे हे सर्व ठीक आहे, परंतू याच्या नावावर पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैसे कमवत आहे. एवढेच नाही तर लोकांना मारहाण करत आहे आणि गैरव्यवहार करत आहे. हे योग्य नाही.

पोलीस कर्मचारी शिव्या देऊ शकत नाहीत आणि मारहाणही करु शकत नाहीत –
माहिती आधिकार कार्यकर्ता अनुभव सुखीजा यांच्या एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी सांगितले की, पोलीस हाताने इशारा करुन वाहन थांबवू शकतात. तपास करु शकतात, पोलिसांच्या इशाऱ्यावर वाहन चालक थांबला नाही तर वाहन चालकांवर कारवाई करण्यात येईल. परंतू पोलीस कर्मचारी शिव्या देऊ शकत नाहीत आणि मारहाणही करु शकत नाहीत. पोलिस वाहनांचे प्रदूषण स्तर प्रमाणपत्र (PUC) तपासू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –