सावधान ! आता चारचाकीमध्ये पाठीमागील सीटवर बसणार्‍यांना सीट बेल्ट बंधनकारक, अन्यथा ‘इतका’ दंड, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात नवीन वाहन कायदा (मोटार व्हेईकल ऍक्ट) लागू होऊन 10 दिवस झाले आहेत. परंतु अद्याप वाहनचालकांना नियमांची नीटशी माहिती नाही. म्हणूनच, बऱ्याचदा नकळत त्यांच्याकडून नियम मोडले जात आहेत. नव्या कायद्यात दंड (चलन) मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम आहे. इतका मोठा दंड पाहून लोकांना काय करावे हे समजत नाहीये. दुसरीकडे, नियम मोडणाऱ्यांबरोबर वाहतूक पोलिस कडकपणे वागत आहेत. आता सर्व नवीन चार चाकी वाहनांमध्ये स्टँडर्ड फिटिंग्ज म्हणून मागील सीटवर सेफ्टी बेल्टसुद्धा आहेत. हे लोकांच्या सुरक्षिततेसाठी केले गेले आहे. नवीन नियमानुसार हे बेल्ट लावनेही बंधनकारक असून जर तुम्ही तो बेल्ट घातला नाही तर तुमचे चलन कापले जाऊ शकते. ट्रॅफिक पोलिसांनी यासाठी तयारी सुरू केली आहे. सीट बेल्ट न लावण्यासाठी 1000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

काही राज्य सरकारांनी सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीवर बंदी घातली आहे, तर काही राज्ये ती बदलून येथे अंमलात आणण्याचा विचार करीत आहेत. मागच्या सीटवर पट्टा न बांधता प्रवास करताना आढळून आल्यास ट्रॅफिक पोलिस चलन कापत असल्याच्या बातम्या काही ठिकाणाहून आल्या आहेत. अशा परिस्थितीत मागे बसलेल्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, मागे बसलेल्या लोकांसाठीही दंड आकारला जाईल का? तर याचे उत्तर ‘होय’ असे आहे. काही लोकांना असे वाटते की जे मागे बसतात त्यांच्यावर असा कोणताही नियम लागू केलेला नाही. जर वाहनाला सीटबेल्ट असेल आणि आपण त्यास बांधले नसेल, तर नवीन नियमानुसार, ट्रॅफिक पोलिस आपले चलन कापू शकतात.

‘नेमकं’ काय म्हटलंय कायद्यात :
नवीन वाहन कायद्याच्या कलम 194 बी मध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले नाही की केवळ समोरच्या आसनावर बसणाऱ्यांनाच सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे. मागील सीटवर सेफ्टी बेल्ट बसवण्याची गरज नाही असेही म्हटले गेले नाही. परंतु या कायद्यात असे म्हटले आहे की चालक आणि प्रवासी दोघांनाही सीट बेल्ट असणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास 1000 रुपये दंड होईल. आता नवीन वाहनांमध्ये मागच्या सीटवर बेल्ट्सदेखील देण्यात आलेले आहेत, तुम्ही ते लावणे गरजेचे आहे अन्यथा या कायद्यानुसार पोलिस सहजपणे चलन कापू शकतात आणि तुम्ही त्यास आव्हान देऊ शकणार नाही.

अलीकडे, मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की काही ठिकाणी मागील सीटवर बसलेल्या लोकांचेही चलन कापले गेले आहेत आणि 1000 रुपयांपर्यंत दंडही वसूल केला आहे. याआधी सन 2014 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक बसली तेव्हा मागील सीटवर बसलेल्या लोकांनी सीट बेल्ट लावण्याचे प्रकरण चर्चेत आले होते. या धडकेत मुंडे यांचा मृत्यू झाला होता झाले. मुंडे मागील सीटवर बसले होते आणि त्यावेळी त्यांनी सेफ्टी बेल्ट लावला नव्हता.

 

Loading...
You might also like