‘फाईन’ चं रेकॉर्ड ! वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानं कार मालकाला 10 लाखाचा ‘दंड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर पोलीस आणि वाहतूक विभागाकडून वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल करण्यास सुरुवात झाली. दररोज जास्तीत जास्तात दंड वसूल केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. परंतू याही पुढे जाऊन सर्वात मोठा दंड गुजरातमध्ये आकारण्यात आला. गुजरातमध्ये एका चारचाकी मालकाकडून एवढा दंड वसूल करण्यात आला की तुम्ही या दंडातून दुसरी नवी कार खरेदी करु शकतात. गुजरातमध्ये पोलिसांनी एका कार मालकाला वाहनावर नंबर प्लेट नसल्यामुळे 1 ते 2 हजार रुपयांचा नाही तर तब्बल 9 लाख 80 हजार रुपयांचा दंड ठोठवला.

गुजराताच्या अहमदाबादच्या सिंधुभवन रोडवर पोलिसांनी एक पोर्शे कारच्या मालकच्या कारला नंबर प्लेट नसल्याने, वाहन परवाना आणि गाडीची कागदपत्र नसल्याने 9 लाख 80 हजाराचा दंड ठोठावला. नव्या मोटर वाहन कायद्यानुसार हे आता पर्यंतचे सर्वात मोठा दंड आकरण्यात आला आहे. एवढेच काय तर वाहन मालकाने हा दंड भरला देखील. ज्या गाडीचे चलन पोलिसांनी कापले ती पोर्शे कंपनीची लग्जरी गाडी आहे. बाजारात या गाडीची किंमत जवळपास 2 कोटी रुपयांच्या आसपास आहे. गुजरात पोलिसांनी मागील महिन्यात जवळपास 10 लग्जरी गाड्याचे चलन कापले.

दुसरीकडे पोलिसांकडून आकारल्या जाणाऱ्या या दंडामुळे ट्रक चालक खूपच त्रस्त आहेत, मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी देशभरात आंदोलन देखील केले. ट्रक चालकांचे म्हणणे आहे की नवा मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रक व्यवसायिकांकडून चार पट जास्त चलन वसूल करत आहेत.

एका ट्रक मालकाचा आरोप आहे की पोलीस कर्मचाऱ्यांकडून मनाला येईल तसे चलन कापले जात आहे. ज्यामुळे भ्रष्टाचार वाढत आहे आणि ट्रक व्यवसायिक आपल्या ट्रकची हप्ते देखील भरता येत नाहीत. त्यामुळे ट्रक व्यवसायिकांवर वाईट परिणाम होत आहे. ज्यामुळे ते आंदोलन देखील करत आहेत.

Visit : Policenama.com