कॅबमध्ये ‘कंडोम’ नसल्यानं ड्रायव्हरला झाला पोलिसांकडून दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन मोटर वाहन कायद्यानुसार मोठे दंड भरण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. दिल्लीतील कॅब चालकांनी याबाबत एक अजीब आरोप केला आहे. कॅब चालकांनी कॅबमध्ये कंडोम ठेवले नाही म्हणून दंड आकारला गेला असल्याचे म्हटले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कॅब ड्राइव्हरला गाडीतील फर्स्ट एड बॉक्समध्ये कंडोम ठेवले नाही म्हणून दंड भरावा लागला आहे. त्यामुळे दंड न भरण्यासाठी कंडोम ठेवणे आवश्यक आहे असे कॅब चालकाचे मत आहे. मात्र असा कोणताही नियम सध्या तरी नाही.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या नेल्सन मंडेला मार्गावर धर्मेंद याला ट्रॅफिक पोलिसांनी आडवले त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे होती. मात्र फर्स्ट एड बॉक्स मध्ये कंडोम नसल्यामुळे त्याला दंड भरावा लागला विशेष म्हणजे दंडाच्या पावतीवर ओव्हर स्पीड असं लिहिलं गेलं होत.

दिल्लीच्या सर्वोदय ड्राइवर असोसिएशनचे अध्यक्ष कमलजीत गिल यांनी सांगितले की, प्रत्येक कॅब धारकाने फर्स्ट एड बॉक्स मध्ये तीन कंडोम ठेवणे गरजेचे आहे. याचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. खरंतर अपघात झाल्यावर याचा वापर होऊ शकतो, कंडोम हे कोणत्याही अपघातात रक्त प्रवाह होण्यापासून थांबवू शकते अशी माहिती गिल यांनी यावेळी दिली.

कंडोम ठेवण्याबाबत कोणताही नियम नाही
अशाप्रकारे चालकाने गाडीमध्ये कंडोम ठेवण्याबाबत कोणताही अधिकृत नियम नाही. उलट अशाप्रकारे जर कोणाला दंड भरावा लागत असेल तर त्याने त्याची रीतसर तक्रार करावी अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्ली मोटर व्‍हेईकल अ‍ॅक्‍ट- 1993 आणि सेंट्रल मोटर व्‍हेईकल अ‍ॅक्‍ट, 1989 यामध्ये अशा नियमाचा कोणताही उल्लेख नाही.

Visit – policenama.com