नवरात्रीमध्ये गाडी चालवताना रहा सतर्क, तुमच्या ‘या’ एका चूकीमुळं होऊ शकतं लायसन्स रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोटर वाहन नियमात नव्या दुरूस्तीतून प्रवाशी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी समान बदल झाले आहेत. कागद डिजिटल बनवण्याशिवाय जर कुणी व्यक्तीने ट्रॅफिक पोलिसांशी उन्मत्तपणा केला, तर त्याचे चलान फाडण्यासह लायसन्स सुद्धा रद्द केले जाऊ शकते. याशिवाय कार न थांबवणे, ट्रकमध्ये प्रवाशी असल्यास सुद्धा लायसन्स रद्द केले जाईल.

डिजिटायजेशनला प्रोत्साहन देण्यावर जोर
प्रवाशांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारने लायसन्स, मेंटनन्सचे कागदपत्र डिजिटाइज करण्याशिवाय ई-चलानच्या सुविधेचा सुद्धा समावेश केला आहे. या सर्व गोष्टी एका आयटी पोर्टलवरून उपलब्ध होतील. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वैध आढळलेल्या वाहनांचे कागदपत्र तपासणीसाठी फिजिकल पद्धतीने मागितले जाणार नाहीत. लायसेन्सिंग प्राधिकरणाद्वारे अयोग्य किंवा रद्द ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती नोंदवली जाईल आणि पोर्टल क्रमानुसार अपडेट केले जाईल.

मोटर वाहन नियमात बदल
रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने म्हटले आहे की, 1989 च्या मोटर वाहन नियमात बदलाचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामध्ये डिजिटल कागदपत्र, मेन्टेनन्स आणि ई-चलान आदि आयटी पोर्टलवरून होणार असल्याचे म्हटले आहे. आयटी सेवा आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीसाठी देशात वाहतूक नियमांना चांगल्या पद्धतीने लागू करता येणार आहे. यामुळे चालकांचा छळ दूर होणार आहे आणि नागरिकांना सुविधा मिळणार आहे.

ड्रायव्हर्सवर असेल प्राधिकरणाची नजर
मोटर वाहन अ‍ॅक्ट, 2019 चे प्रकाशन मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झाले होते. सरकारने म्हटले होते की, दुरूस्तीतून चलानची व्याख्या उपलब्ध होते. आयटीच्या माध्यमातून सेवा प्रदान करणे, इलेक्ट्रॉनिक देखरेख आणि संचालनासाठी पोर्टल एक आवश्यकता म्हणून आणण्यात आले. यात म्हटले आहे की, रद्द किंवा योग्य ठरवलेल्या लायसन्सला पोर्टलमध्ये क्रमानुसार नोंदवले जाईल आणि ड्रायव्हरवर लक्ष ठेवले जाईल. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कागद दाखवण्यास मान्यता दिल्याची तरतूदही असल्याचे या अ‍ॅक्टरमध्ये आहे.

तपासणार्‍या अधिकार्‍याची ओळखही नोंदली जाईल
हे सुद्धा म्हटले आहे की, कोणत्याही कागदपत्राची मागणी किंवा निरीक्षण केल्यास पोलीस अधिकार्‍याचे पद आणि राज्य सरकारद्वारे अधिकृत कोणत्याही अन्य अधिकार्‍याचे निरीक्षण आणि ओळखची तारीख आणि वेळेची नोंद पोर्टलवर केली जाईल. यामुळे वाहनांची अनावश्यक पुन्हा होणारी तपासणी टाळण्यास मदत होईल. तसेच पुढे वाहन चालकांचा होणारा छळदेखील दूर होईल.