नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आत्तापर्यंत जगातील 7.73 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता अजून एका नव्या खतरनाक कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. हा विषाणू मलेशिया येथे आढळून आला असून डी 614 जी (D614G) ,असं या विषाणूचे नाव आहे. सध्या असणाऱ्या कोरोना विषाणूपेक्षा दहा पट अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. या विषाणूची माहिती मलेशियाचे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ नूर हिशाम अब्दुल्लाह यांनी फेसबुकवरून दिली.
माहितीनुसार असं समजतंय कि, अशा प्रकारची केस तीन वेळा नोंदवली गेली. या घटना तेव्हा नोंदवल्या गेल्या जेव्हा एक हॉटेल मालक आणि काही स्थानिक लोक भारतातून परत गेले होते. अजून एका नोंदीमध्ये फिलिपिन्स वरून आलेल्या नागरिकाचा समावेश आहे. अब्दुल्लाह म्हणाले की, या नव्या विषाणूचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, आत्तापर्यंत या दोन ठिकाणी अजून अधिक परीक्षण करून याबाबद्दलची माहिती गोळा करण्याची करणार आहोत. सध्या ही एक प्राथमिक चाचणी असून अजून काम सुरु आहे.
अब्दुल्ला म्हणाले, याचा अर्थ असा आहे की लोकांना अजून अधिक काळजी घेण्याची आणि सतर्क राहण्याची गरज आहे. हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीला दहापट अधिक घातक परिणाम करू शकतो आणि वेगाने पसरतो.
मलेशिया सरकारचा मुख्य उद्देश तेथील सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा आहे. सोबतच लोकांना कोविड-19 शी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.