विजय मल्ल्याची बँकांना नवी आॅफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने बँकांना एक नवी आॅफर दिली आहे. मी १०० टक्के कर्ज फेडायला तयार आहे. मात्र, बँकांनी व्याज विसरावे. मुद्दलीची परतफेड करु शकेन पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचे प्रत्यार्पण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्याने ट्विटरवरुन बँकांच्या थकीत कर्जावर भाष्य केले आहे. विजय मल्ल्या म्हणतो, किंगफिशर मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून गेल्या तीन दशकापासून कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. आम्ही अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सनेही अनेक राज्यांना मदत केली होती. पण दुदैर्वाने किंगफिशर एअरलाइन्सचे नुकसान झाले. तरीही मी बँकांना कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे. यामुळे बँकांचेही नुकसान होणार नाही, असे त्याने सांगितले.

एअरलाइन्स कंपनीला विमानाचे इंधन महागल्याचा फटका बसला. यामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आणि बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. मी बँकांचे १०० टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. कृपया बँकांनी माझी आॅफर स्वीकारावी, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे.

प्रसारमाध्यमे आणि नेतेमंडळी माझ्यावर बँकांचे कर्ज बुडवून पसार झाल्याचा आरोप करतात. पण त्यात तथ्य नाही. मला निष्पक्ष वागणूक का दिली जात नाही, असा सवाल त्याने विचारला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like