पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचे ‘हे’ आहेत नवीन नियम, जाणून घ्या

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. आज (सोमवार) मध्यरात्रीपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पेट्रोल पंप व गॅसपंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरु राहणार असून ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनांना इंधन पुरवठा करु शकतील.

कंपन्या सुरु राहणार असून कामगारांना स्वत:च्या वाहनाने ये-जा करता येणार आहे. मात्र, त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना पास देऊन त्यांची माहिती पोलीस ठाण्यांना द्यायची आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री आयुक्तांनी आदेश काढले होते. त्यातील काही अटी व शर्ती बदलून आज दुपारी नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार कामगारांना कामावर जाण्यासाठी कंपनीतील मुष्यबळ विभागाकडून (एचआर) पत्र घ्यावे लागणार आहे. तसेच कंपनीचे ओळपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडवल्यास पास आणि कंपनीचे ओळखपत्र दाखवावे लागेल.

आयटी उद्योगामध्ये 15 टक्के कर्मचारी क्षमतेसह सुरु ठेवता येणार आहे. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसुद्धा कंपनीने दिलेला पास व ओळखपत्र जवळ बाळगावे लागेल. पोलिसांनी अडवल्यास त्यांना ते दाखवून पुढील प्रवास करावा लागणार आहे. शेतमाल प्रक्रिया उद्योगांनासुद्धा हाच निय लागू आहे.

लॉकडाऊन कालावधीत कंपनीत कामावर असलेल्या कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्या उपचारासह अन्य कामगारांच्या तपासणीचा खर्च कंपनी व्यवस्थापनाला करावा लागेल. तसेच संपूर्ण कंपनी व परिसराचे निर्जुंकीकरण करावे लागेल. महापालिकेने यापूर्वी दिलेले पास रद्द करण्यात आले आहेत. शहरांतर्गत सेवांकरीताचे पास [email protected] या वेबसाईटवर घेता येईल. आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.