New Parliament Building | ‘त्या’ घटनांचा उल्लेख करत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले- ‘हे सगळे खुर्चीचे सौदागर, मोदींचा…’

New Parliament Building | devendra fadnavis bjp slams opposition targeting pm narendra modi on new parliament building
File Photo
ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संसदेच्या नवीन इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन होणार आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते उद्घाटन (Inauguration) व्हावे अशी मागणी करत 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे. यापार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

देशभरात सध्या संसदेच्या नव्या इमारतीच्या (New Parliament Building) उद्घटनाची चर्चा सुरु आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत (Central Vista Project) नव्या संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या नव्या वास्तूचे उद्घटन होणार आहे. या समारंभावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. मात्र अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना फडणवीस यांनी याआधी अनेक प्रसंगी राज्यपाल (Governor) किंवा राष्ट्रपतींना डावलून घटनात्मक संस्थांच्या इमारतीच्या बांधकामाचे उद्घाटन किंवा भूमिपूजन नेतेमंडळींनी केल्याची उदाहरणे दिली.

 

मी त्यांचा निषेध करतो

फडणवीस म्हणाले, ते जेव्हा करतात ते लोकशाहीला (Democracy) धरुन असतं आणि पंतप्रधान मोदी जेव्हा उद्घाटन करतात तेव्हा बहिष्कार (Boycott) करणं हा दुटप्पीपणा आहे. हे लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यांना देशाशी आणि संविधानाशी (Constitution) काहीही देणंघेणं नाही. हे केवळ खुर्चीसाठी राजकारण (Politics) करणारे लोक असून मी त्यांचा निषेध करतो, असं फडणवीस म्हणाले.

 

विरोधक खुर्चीचे व्यापारी

विरोधक खुर्चीचे व्यापारी आहेत. त्यांना सत्ता आणि खुर्चीची लालसा एवढी आहे, की त्यासाठी हे सगळे एकत्र येतता. त्यांना हे माहिती आहे की मोदींचा ते सामना करु शकत नाहीत. त्यांच्याकडे ना नेता आहे, ना नीती आहे, ना नियत आहे. त्यामुळे हे सगळे एकत्र येऊन असं समजतात की ते मोदींना बदनाम करतील आणि सत्तेची खुर्ची परत मिळवतील.मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं.

 

फडणवीसांनी दिली यादी

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी याआधी काँग्रेस (Congress) आणि देशातील इतर राज्यात विरोधी पक्षांच्या कार्यकाळात झालेल्या उद्घाटन, भूमिपूजनाची यादी दिली. मी विरोधकांना विचारतो की, इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) संसदेच्या अॅनेक्स इमारतीचं (Annex Building) उद्घाटन केलं त्यावेळी का बहिष्कार टाकला नाही? इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं (Maharashtra Vidhan Bhavan) उद्घाटन केलं, त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते का नाही केलं? राजीव गांधींनी (Rajiv Gandhi) संसदेच्या ग्रंथालयाचं (Parliament Library) उद्घाटन केलं त्यावेळी राष्ट्रपतींची आठवण झाली नाही का? तामिळनाडूच्या विधानसभेचं (Tamil Nadu Assembly) उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते, सोनिया गांधी (Sonia Gandhi) होत्या. नीतीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या सेंट्रल हॉल (Central Hall) उद्घाटन केलं. तेव्हा जेडीयुनं बहिष्कार का नाही टाकला?, असा प्रश्न देवेंद्र फडणीवस यांनी विरोधकांना केला.

 

फडणवीसांनी सांगितली ममता बॅनर्जी, गोगोई, केजरीवालांची उदाहरण

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, युपीएचं सरकार (UPA Government) असताना मणिपूरच्या इन्फाळमध्ये मनमोहन सिंह (Manmohan Singh) आणि सोनिया गांधी यांनी तिथल्या विधानभवनाचं (Manipur Legislative Assembly) उद्घाटन केलं. त्यावेळी राज्यपालांच्या हस्ते का उद्घाटन केलं नाही? तरुण गोगाई (Tarun Gogoi) यांनी 2014 मध्ये आसामच्या विधानभवनाचं (Assam Legislative Assembly) उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रणही दिलं नाही. त्याचवर्षी झारखंडमध्ये हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी विधानभवनाचं (Jharkhand Vidhan Bhavan) उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रण दिले नाही.

 

2018 मध्ये आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचं (Andhra Pradesh Legislative Assembly) उद्घाटन केलं.
ते राज्यपालांच्या हस्ते का केले नाही? 2020 मध्ये तर सोनिया गांधी छत्तीसगडच्या विधानभवनाचं (Chhattisgarh Vidhan Bhavan)
भूमिपूजन केलं. त्या तर कोणत्या संवैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या.
ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचे (Jubilee Memorial Building)
उद्घाटन केलं. राज्यपालांना निमंत्रण का दिलं नाही.
अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी विधानसभा रिसर्च बिल्डिंग (Assembly Research Building) उद्घाटन केलं.
उप राज्यपालांना निमंत्रण का दिलं नाही? अशा घटना फडणवीसांनी सांगितल्या.

 

हे सगळे खुर्चीचे सौदागर

रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार झाले आहे. आत्ताच्या संसद भवन कौन्सिल हॉल (Council Hall) होता.
पहिल्यांदा देशात पूर्ण संसद भवन तयार करण्यात आले. त्याचे उद्घाटन जर मोदी करतात,
तर मग त्यांच्यावर अशा प्रकारचा बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत.
मोदींचा मुकाबला करु शकत नाहीत. म्हणून हे सगळे एकत्र आले आहेत. मात्र माझाल सवला आहे,
एवढी उदाहरणं मी दिली, त्याचं आधी उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला.

 

 

 

 

Web Title :  New Parliament Building | devendra fadnavis bjp slams opposition targeting
pm narendra modi on new parliament building

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts