New Parliament Building Inauguration | …तर सगळे संसद भवनाच्या उद्घाटनाला गेले असते, सुप्रिया सुळेंनी सांगितलं नाराजीचं कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – New Parliament Building Inauguration | नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार (Boycott) टाकला होता. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकतर आम्हाला तीन दिवसांपूर्वी कमिटी मेंबर म्हणून मेसेज आला. लोकसभा (Lok Sabha) हे आमच्यासाठी मंदिर आहे. एरवी बिल पास करायचे असतात तेव्हा विरोधकांना फोन करतात. जर सरकारने विरोधी पक्षातील लोकांना फोन केला असता तर सगळे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला (New Parliament Building Inauguration) गेले असते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, मला संसद भवनाची जुनीच वास्तू प्रिय आहे. त्या वास्तूच्या भिंती बोलक्या आहेत. लोकशाहीचं मंदिर माझ्यासाठी जुनीच बिल्डिंग आहे. उपराष्ट्रपतीही अध्यक्ष असतात, त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं नाही. ओम बिर्ला (Om Birla) यांना बोलावलं त्या निर्णयाचं स्वागत, मात्र उपराष्ट्रपतींनाही बोलवायला पाहिजे होतं. हा कार्यक्रम एका व्यक्तीचा होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (New Parliament Building Inauguration)
दरम्यान, भाजप-शिंदे गटाच्या युतीमधील (BJP-Shinde Group Alliance) जागावाटपाबाबत ठाकरे गटाचे (Thackeray group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी यावर बोलणं टाळलं.
त्यांच्या संसरात आम्ही लक्ष देत नाही, भाजप आणि त्यांच्यात काय आहे हे त्यांनी बघावं.
आम्हाला राज्यातील अनेक प्रश्न सोडवायचे आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Web Title : New Parliament Building Inauguration | ncp leader supriya sules reaction on
the inauguration of the new parliament house
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – जिना बांधण्यावरुन विरोध केल्याने तरुणाची गळफास
घेऊन आत्महत्या; शेजारी राहणार्यांवर गुन्हा दाखल - Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात बैठक;
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार - Ambil Odha Babbling Brook to Nasty Drain | डॉ. श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित ‘आंबील ओढा’ पुस्तकाचे प्रकाशन; अजित पवार म्हणाले – ‘पुणेकरांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून काम व्हावे’