New Parliament Building Inauguration | शरद पवारांची संसद भवन सोहळ्यावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- ‘मी तिकडे गेलो नाही याचं समाधान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – New Parliament Building Inauguration | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे आज (रविवार) उद्घाटन झाले. ‘सेंगोल’ची (Sengol) लोकसभेत स्थापना करण्यात आली. तसेच सर्वधर्मीय प्रर्थनाही करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराची (Boycott) चर्चा होत आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार (Rajya Sabha MP Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (New Parliament Building Inauguration)

 

शरद पवार म्हणाले, नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला गेलो नाही, याबद्दल मला समाधान वाटत आहे. कारण, त्याठिकाणी ज्या लोकांची उपस्थिती होती, जे काही धर्मकांड सुरु होतं, ते पाहिल्यानंतर या सोहळ्याला न जाण्याच्या निर्णयाबद्दल मला समाधान वाटले, अशी खोचक टिप्पणी शरद पवार यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (New Parliament Building Inauguration)

 

विज्ञानाशी तडजोड करता येत नाही

आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी (Jawaharlal Nehru) मांडली. मात्र आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्ष पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आजे तिथे जे चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितंल. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला साधू, महाराज मंडळी आण्यात आली, याचे मला कौतुक वाटले, अशी उपरोधक टिप्पणीही पवारांनी केली.

 

पण उपराष्ट्रपतींची उपस्थिती…

संसदेच्या कोणत्याही कामाची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणाने (President’s Speech) होते. मी राज्यसभेच सभासद आहे, तिकडे उपराष्ट्रपती हो प्रमुख असतात. आजच्या सोहळ्यात लोकसभा अध्यक्ष दिसले, याचा आनंद वाटला पण उपराष्ट्रपतींची उपस्थिती दिसली नाही. त्यामुळे हा सगळा सोहळा मर्यादित घटनकांसाठी होता, असा प्रश्न निर्माण झाल्याच शरद पवार यांनी म्हटेले.

 

जुन्या संसदेशी आमची बांधिलकी

जुन्या संसदेशी आमची बांधिलकी आहे. ही बांधिलकी मी खासदार आहे म्हणून नाही.
देशात दिल्लीत कुणीही आल्यानंतर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan)
आणि इंडिया गेट (India Gate) या गोष्टी बघण्याचं औत्सुक्य असतं. आता हे सगळं त्याचं महत्व कमी
करण्याचा प्रयत्न आहे. का आहे कुणास ठाऊक, पण ठीक आहे, आता निर्णय घेतला, राबवलाय, असंही पवार म्हणाले.

 

 

Web Title :  New Parliament Building Inauguration | sharad pawar slams pm narendra modi on new parliament building inauguration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा