New Parliament Building | नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सुप्रीम कोर्टात, जनहित याचिका दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेच्या नवीन इमारतीच्या (New Parliament Building) उद्घाटनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन होणार आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते उद्घाटन (Inauguration) व्हावे अशी मागणी करत 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार (Boycott) टाकला आहे. आता हा वाद सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहचला आहे. न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
नवीन संसद भवनाचं (New Parliament Building) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाही तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घटनाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात आले नाही. ही बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवर (Democracy) थेट हल्ला आहे. तसेच संविधानाचे (Constitution) उल्लंघन केले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
https://twitter.com/LiveLawIndia/status/1661625010589700096?s=20
दरम्यान, नव्या संसद भवनाच्या उद्घटनाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi)
यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटले होते की, नव्या संसद भवनाचे
उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आवे. यानंतर या हा वाद आणखी पेटला.
Web Title : New Parliament Building | president should inaugurate new parliament building pil filed in supreme court
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- CM Eknath Shinde | ‘विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदी सर्वांवर भारी’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
- Maharashtra Politics News | ‘उद्धव ठाकरेंनी मविआ पासून दूर रहावे’, प्रकाश आंबेडकरांच्या सल्ल्यावर उदय सामंत म्हणाले…
- CM Eknath Shinde | ‘घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे आम्ही नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)