‘नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाचे सर्वोच्च प्रतिक असलेल्या नव्या संसद भवनाच्या (Parliament House) भूमिपूजनाचा कार्यक्रम आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते घेण्यात आला. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांच्यासह भाजपचे (BJP) मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योगपती रतन टाटा यांनीही आवर्जून उपस्थिती लावली.

यावेळी रतन टाटा (Ratan Tata) म्हणाले, नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी (Impressive) प्रकल्प (Project) आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं हे मी माझे भाग्य समजतो, असे रतन टाटा म्हणाले. नव्या संसद भवनाचे काम ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ला देण्यात आले आहे.

नव्या संसद भवनाला 971 कोटींचा खर्च

सध्याच्या संसद भवनाला 92 वर्षे झाली आहेत. या संसद भवनाला लागूनच नव्या संसद भवनाची भव्य इमारत उभी राहणार आहे. यासाठी तब्बल 971 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदींनी आज या प्रकल्पाचे भूमीपूजन केले. यावेळी गणेश पुजन आणि विष्णूसह वराहचेही पुजन करण्यात आले. यासोबत सर्वधर्म प्रार्थनेचेही आयोजन करण्यात आले होते. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा सरकारचा मानस आहे.