917 कोटी रूपयांमध्ये बनेल नवीन संसद, प्रत्येक सदस्यास मिळणार कार्यालय, जाणून घ्या 11 विशेष गोष्टी
नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाच्या नवीन संसद भवनाची पायाभरणी व भूमिपूजन करतील. या समारंभात विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित असतील. चार मजली नवीन संसद भवनाची निर्मिती, 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये अंदाजे 971 कोटी रुपये किंमतीमध्ये बांधण्याचा प्रस्ताव आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त त्याचे बांधकाम पूर्ण होईल.
2024 पर्यंत पूर्ण होणाऱ्या श्रम शक्ती भवनमधील कार्यालयासाठी प्रत्येक खासदारांना 40 चौरस मीटर जागा उपलब्ध करुन दिली जाईल. नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभा आणि लोकसभेमध्ये उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकैया नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला होता.
देशाच्या नवीन संसदेशी संबंधित 11 खास गोष्टी खालीलप्रमाणे-
नवीन संसदेची इमारत 64,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये असेल आणि या बांधकामासाठी एकूण 971 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नव्या संसदेच्या इमारतीत भूकंपरविरोधी क्षमता असेल आणि 2000 हजार लोक थेट या बांधकामात सामील होतील आणि तिथे 9000 लोकांचा अप्रत्यक्ष सहभाग असेल.
नवीन संसद भवनात 1224 खासदार एकत्र बसू शकतील आणि विद्यमान श्रम शक्ती भवन (संसद भवनाच्या जवळ) च्या जागी दोन्ही सभागृहातील खासदारांसाठी कार्यालय परिसर बांधला जाईल.
देशातील पुरातत्व मालमत्ता म्हणून संसदेचे सध्याचे सभागृह संरक्षित केले जाईल. नवीन इमारतीच्या बांधकामाच्या पायाशी संबंधित कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केले गेले आहे.
नियमांनुसार, लोकसभा अध्यक्ष हे संसद भवनाचे संरक्षक देखील असतात. नवीन इमारतीच्या बांधकामादरम्यान वायू आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुरेसे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
नव्या संसद भवनात सर्व खासदारांसाठी स्वतंत्र कार्यालये असतील, जी आधुनिक डिजिटल सुविधांनी सुसज्ज असतील आणि हे ‘पेपरलेस कार्यालय’ तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल असेल. नव्या संसदेच्या सभागृहात एक विशाल संविधान कक्ष असेल, जो भारताची लोकशाही परंपरा दर्शवेल. यासह खासदारांसाठी एक आश्रयस्थान असेल. त्यांच्यासाठी ग्रंथालय, विविध समित्यांच्या खोल्या, जेवणाचे खोली आणि पार्किंग क्षेत्र असेल.
या इमारतीच्या लोकसभा कक्षात 888 सदस्यांची बसण्याची क्षमता असेल तर राज्यसभा कक्षात 384 सभासद बसू शकतील. भविष्यात दोन्ही सभासदांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे केले जात आहे.
सध्या लोकसभेचे 543 आणि राज्यसभेचे 245 सदस्य आहेत. सप्टेंबर महिन्यात टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला 861.90 कोटी रुपये किंमतीच्या नवीन संसद भवन बांधण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत ही नवीन इमारत सध्याच्या संसद भवनाजवळ बांधली जाणार आहे.
लोकसभेचा आकार सध्याच्या लोकसभेपेक्षा तीन पट अधिक असेल आणि राज्यसभादेखील सध्याच्या उच्च सदनापेक्षा मोठी असेल. नवीन इमारतीचे अंतर्गत क्षेत्र भारतीय संस्कृतीसह प्रादेशिक कला, कलाकुसर आणि वास्तुकलाचे अनन्य उदाहरण सादर करेल.
सध्याच्या संसद भवनाजवळ बांधले जाणारे नवीन संसद भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल आणि उर्जेच्या कार्यक्षम वापरास व संवर्धनास चालना देईल. सुरक्षेच्या दृष्टीने त्रिकोणी आकाराची नवीन संसद इमारतही दुर्गम होईल.
सन 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेची नवीन इमारत नव्या भारताच्या गरजा व आकांक्षा अनुरुप होईल असे सरकारने म्हटले आहे.