कियारा आडवाणी ‘कॅलेंडर’साठी खरंच ‘न्यूड’ झाली होती का ? आणखी एक फोटो सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणीनं नुकतंच डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशुट केलं होतं. कियारा पूर्णपणे न्यूड झाली होती. कियारानं आपली अप्पर बॉडी एक झाडाच्या मोठ्या पानानं कवर केल्याचं फोटोत दिसत होतं. या फोटोत कियारा कमालीची बोल्ड आणि हॉट दिसत होती. कियाराचं हे फोटोशुट प्रचंड व्हायरल झालं. अनेकांनी कियाराच्या या लुकची खिल्लीदेखील उडवली आहे. कियारा आपल्या या फोटोसाठी प्रचंड ट्रोल झाली. इतकेच काय तर लोकांनी डब्बूचीही खिल्ली उडवली होती. या फोटोबद्दल एक खुलासा करण्यात आला आहे.

कियाराचा हा टॉपलेस फोटो घेऊन अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवले होते. जे सोशलवर व्हायरल झाले. कियारा पहिल्यांदाच न्यूड अवतारात दिसली आणि पहिल्याच फोटोशुटसाठी ती ट्रोल झाली. काहींनी कियाराचा फोटो फोटोशॉप केला आहे आणि तिला कपडे घातले. कियारा अनेक फोटोत वेगळ्या कपड्यांमध्ये दिसली. एका फोटोत ती साडीत तर एका फोटोत ती टी शर्टमध्ये. एकानं तर तिला कॅप्टन अमेरिकाचा गेपअप दिला.

या सगळ्यानंतर आता कियारााच आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यातून असं दिसत आहे की, कियाराचा हा फोटो कॅमेऱ्याची ट्रीक वापरून काढण्यात आला आहे. यानंतर आता कियारा खरंच टॉपलेस झाली होती का असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. कारण या नव्या फोटोत दिसत आहे की, कियारानं स्किन कलरचे कपडे घातले आहेत. त्यामुळे पानामागे ती अशी थांबली की ती न्यूड आहे असं वाटत आहे. समोर आलेला नवीन फोटो डब्बूच्या फोटोशुटदरम्यानचा आहे असा दावा केला जात आहे. त्यामुळे चाहते आता संभ्रमात पडले आहेत.

 

You might also like