Hero च्या मोटरसायकल आणि स्कूटर्सची नवी प्राईस लिस्ट, जाणून घ्या प्रत्येक मॉडलची किंमत

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्प, ज्याचे अगोदरचे नाव हिरो होंडा होते, भारतीय मोटरसायकल आणि स्कूटर तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतासह जगातील सर्वात मोठी दुचाकी तयार करणारी कंपनी आहे. भारतात दुचाकी कॅटगरीत तिची बाजरातील भागीदारी सुमारे 46 टक्के आहे. हिरोने भारतात एका पेक्षा एक शानदार मोटरसायकल आणि स्कूटर सादर केल्या आहेत.

यामधील सर्वात दमदार मॉडेल आहे स्प्लेंडर. हिरोने आकर्षक अशा स्कूटरसुद्धा भारतीय बाजारात आणल्या आहेत. याशिवाय कंपनी येत्या काही महिन्यात आणखी दमदार मॉडल सादर करू शकते. जर तुम्ही हिरोची बाईक किंवा स्कूटर खरेदी करणार असाल तर प्रथम कंपनीच्या प्रत्येक दुचाकी मॉडलची किंमत जाणून घ्या. जाणून घेऊयात हिरोची पूर्ण प्राईस लिस्ट…

हिरो मोटरसायकलची नवी प्राईस लिस्ट

– हिरो स्प्लेंडर प्लस : 60,253 रुपयांपासून सुरू

– हिरो एचएफ डिलक्स : 49,213 रुपयांपासून सुरू

– हिरो पॅशन प्रो 110 : 66,043 रुपयांपासून सुरू

– हिरो पॅशन प्रो आय3एस : 52,827 रुपयांपासून सुरू

– हिरो सुपर स्प्लेंडर : 69,058 रुपयांपासून सुरू

– हिरो ग्लॅमर : 60,633 रुपयांपासून सुरू

– हिरो ग्लॅमर आय3एस : 71,000 रुपयांपासून सुरू

– हिरो एक्सपल्स 200 : 98,844 रुपयांपासून सुरू

– हिरो ग्लॅमर एफआय : 70,894 रुपयांपासून सुरू

– हिरो पॅशन एक्सप्रो : 59,082 रुपयांपासून सुरू

– हिरो एचएफ डिलक्स आय3एस : 58,162 रुपयांपासून सुरू

– हिरो एक्सट्रीम 200एस : 1,01,713 रुपयांपासून सुरू

– हिरो एक्सट्रीम 200आर : 92,884 रुपयांपासून सुरू

– हिरो एक्सपल्स 200टी : 95,935 रुपयांपासून सुरू

– हिरो स्प्लेंडर आयस्मार्ट 110 : 65,509 रुपयांपासून सुरू

हिरोच्या स्कूटर्सची नवी प्राईस लिस्ट :

– हिरो प्लेजर : 48,297 रुपयांपासून सुरू

– हिरो मायस्ट्रो एज : 54,850 रुपयांपासून सुरू

– हिरो ड्यूट : 49,972 रुपयांपासून सुरू

– हिरो प्लेजर+ 110 : 58,977 रुपयांपासून सुरू

– हिरो मायस्ट्रो एज 125 : 71,393 रुपयांपासून सुरू

– हिरो डेस्टीनी 125 : 66,529 रुपयांपासून सुरू

हिरोचे आगामी मॉडल आणि त्यांची अंदाजे किंमत :

– हिरो एक्सट्रीम 160आर : 90,000 रुपये

– हिरो एक्सपल्स 200 : 1.15 लाख रुपये

– हिरो एक्सट्रीम 200एस : 1.01 लाख रुपये

– हिरो एक्स्ट्रीम 200आर : 93,400 रुपये

– हिरो एक्सपल्स 200टी : 95,500 रुपये

– हिरो एक्सएफ3आर : 1.85 लाख रुपये

– हिरो 450 एडीव्ही : 2.20 लाख रुपये

– हिरो ईमायस्ट्रो : 1.00 लाख रुपये

हिरोचा सेल्स

मे 2020 मध्ये हिरो मोटोकॉर्पने एकुण 112,682 युनिट्स दुचाकी वाहने विकली. यामध्ये 6644 स्कूटर आणि 106,038 मोटरसायकल आहेत. बजाजने मागच्या महिन्यात एकुण 112798 दुचाकी विकल्या. दोन्ही कंपन्यांच्या सेल्समध्ये जास्त फरक नाही, पण बजाजने बाजी मारली आहे. जर मागच्या वर्षीची तुलना केली तर दोन्ही कंपन्यांच्या सेल्समध्ये खुप घसरण झाली आहे, ज्याचे थेट कारण लॉकडाऊन आहे. मागच्या वर्षी मे महिन्यात बजाज ऑटोने 365,068 दुचाकी वाहने विकली होती, तर हिरोचा सेल्स यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे 652,028 युनिट्स होता.