‘या’ महिलेच्या आवाजापुढं रानू मंडलही ‘फिकी’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनर भीक मागून स्वत:चं पोट भरणाऱ्या रानू मंडलंचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि रानू मंडल रात्रीतून स्टार झाली. बॉलिवूड प्लॅबॅक सिंगर हिमेश रेशमियानं तिला गाण्यासाठी संधी दिली. यानंतर आता पुन्हा एका महिलेच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय काहींनी तर तिला रानू मंडलहून बेस्ट म्हटलं आहे.

सुबोध घिलडियाल नावाच्या एका युजरनं या महिलेचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंट वरून शेअर केला आहे. सुबोध लिहितात की, “या सुरेल आवाजाच्या महिलेला कोणी शोधू शकेल का ? अनेकांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आवाजाचंही कौतुक केलं आहे.

महिलेनं ताज महल सिनेमातील जो वादा किया वो हे गाणं गायलं आहे. या गाण्याची मूळ गायिका लता मंगेशकर आहेत. अमित ढडवाल यांनी हे गाणं लिहिलं आहे. अनेकांना हे गाणं ऐकताना रानू मंडलची आठवण झाली. काहींनी तर म्हटलं की, या महिलेचा आवाज तर रानू मंडलपेक्षा बेस्ट आहे. तिच्या टॅलेंटला वाव मिळायला हवा अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिली आहे.

महिलेची कोणतीही खासगी माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या महिलेचा व्हिडीओ मात्र प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. पंरतु आता या महिलेलाही रानू मंडलप्रमाणे संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com