आता संसदेच्या कँटीनमध्ये 100 रुपयांना व्हेज तर 700 ला नॉनव्हेज थाळी, येथे पहा पूर्ण लिस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   संसदेचे बजेट सत्र 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे, जे 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल. सत्रापूर्वी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी संसदेच्या कँटीनमध्ये मिळणार्‍या पदार्थांवरील सबसिडी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच नवी लिस्ट जारी केली आहे.

नव्या दरानुसार, शाकाहारी थाळी 100 रुपयात आणि नॉनव्हेज थाळी 700 रुपयात मिळेल. जनतेतून टीका होऊ लागल्याने संसदेत सबसिडी बंद करण्याची मागणी केली जात होती. नव्या दरांबाबत बोलायचे तर संसदेच्या कँटीनमध्ये आता रोटीच स्वस्त राहीला आहे. रोटीची किंमत तीन रूपये मात्र आहे. संसदेच्या कँटीनचे नवे दर किती आहेत त्यावर नजर टाकूयात…

खाण्याचे पदार्थ किंमत (रुपयात)

1  आलू बोंडा(एक पीस) 10
2  उकडलेली भाजी 50
3  ब्रेड पकोडा 10
4  रोटी (एक पीस) 03
5  चिकन बिर्याणी 100
6  चिकन करी (दोन पीस) 75
7  चिकन कटलेट (दोन पीस) 100
8  चिकन फ्राय (दोन पीस) 100
9  दही 10
10  दही भात, लोणचे 40
11  दाल तडका 20
12  डोसा मसाला 50
13  सादा डोसा 30
14  अंडा करी (दोन अंडी) 30
15  फिंगर चिप्स 50
16  मासे आणि चिप्स 110
17  चटणीसह साथ इडली (दोन पीस) 20
18  सांबर, चटणसह इडली 25
19  कढी पकोडा 30
20  केसरी भात 30
21  लोणच्यासह खिचडी 50
22  लेमन राईस 30
23  मसाला डाळवडा (दोन पीस) 30
24  मेदू वडा (दोन पीस) 30
25  मटण बिर्याणी 150
26  मटण करी (दोन पीस) 125
27  मटण कटलेट (दोन पीस) 150
28  ऑम्लेट मसाला (दोन अंडे) 25
29  ऑम्लेट साधे 20
30  व्हेज पकोडा (6 पीस) 50
31  पनीर कडाई 60
32  पनीर मटर 60
33  पोहा 20
34  पोंगल 50
35  तांदळाची खीर 30
36  शेवई खीर 30
37  टोमॅटो भात 50
38  उपमा 25
39  उत्तपम 40
40  ताजा ज्यूस 60
41  लंच नॉनव्हेज बुफे 700
42  लंच व्हेज बुफे 500
43  व्हेज थाळी 100
44  सूप 25
45  समोसा 10
46  कचोरी 15
47  पनीर पकोडा (4 पीस) 50
48  तंदूरी रोटी 05
49  मिनी थाळी व्हेज 50
50  भाजी (व्हेज करी) 20
51  सूखी भाजी 35
52  रोस्टेड पापड 05
53  सलाड ग्रीन 25
54  स्टीम राईस 20
55  व्हेजिटेबल बिर्याणी 50
56  व्हेजिटेबल कटलेट (दोन पीस) 20
57  पाच मसाला पूरी, भाजी, कांदा 50