पुणेमहत्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे दिवसेंदिवस देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे वैद्यकीय क्षेत्रातील काळाबाजार उघडकीस येत आहे. फक्त ४ ते ५ किमी अंतर जाण्यासाठीही रुग्णवाहिकांकडून ambulance हजारो रुपये आकारले जात आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात घेऊन रुग्णवाहिका चालकाकडून जास्तीचे पैसे आकारल्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) हा काळाबाजार रोखण्यासाठी रुग्णवाहिकांचे ambulance नवे दर नुकतेच निश्चित केले आहेत. तर ठरवून दिलेल्या दरापेक्षा आगाऊ पैसे आकरल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरटीओ प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांनी फ्लेक्सच्या स्वरूपात रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिकांचे नवीन दर लावावेत, असा आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी दिला आहे. हे फ्लेक्स नागरिकांना सहज दिसतील, अशा ठिकाणी लावण्याची अटही आरटीओ घातली आहे. त्याचबरोबर ठरवून दिलेल्या दरापेक्षा ज्यादा आकारणी केल्यास नागरिकांनी [email protected] किंवा [email protected] वर संपर्क साधावा, असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.

त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२, १३ किंवा १४ रुपये आकारावेत, असा आदेश आरटीओकडून देण्यात आला आहे. त्याचबरोबर रुग्णाला घेऊन जाण्यापूर्वी प्रतीक्षा करावी लागली तर, प्रतीक्षा शुल्क म्हणून प्रतीतास १००, १२५ आणि १५० रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, रुग्णवाहिकांना पहिल्या दोन तासांसाठी अथवा २५ किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार, ६०० ते ९५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास कारवाई करण्याचा सक्त इशारा देखील आरटीओकडून देण्यात आला आहे.

Also Read This : 

 

चंद्रपूरातील दारुबंदी ‘उठविली’ अन् नागपूर, यवतमाळ, मध्यप्रदेशातील मद्यमाफियांचा ‘बाजार’ उठला !

 

जमिनीवर बसून जेवणाचे ‘हे’ ४ फायदे, जाणून घ्या

 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय

Back to top button