New Royal Enfield | प्रतीक्षा संपली, या दिवशी लाँच होईल Royal Enfield Classic 350 नेक्स्ट जनरेशन, जाणून घ्या काय असू शकतात फीचर्स आणि किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Royal Enfield | देशाची प्रमुख क्रुझर बाईक उत्पादक कंपनी रॉयल इनफील्ड आपली बेस्ट सेलिंग बाईक क्लासिक 350, New Royal Enfield Classic 350 चे नेक्स्ट जेनरेशन मॉडल 1 सप्टेंबरला लाँच करणार आहे.

 

स्पेसिफिकेशनच्या बाबतीत खुप पुढे

कंपनीनुसार ही बाईक सध्याच्या क्लासिक 350 पेक्षा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन (Features and Specifications) च्या बाबतीत खुप पुढे राहणारी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेक्स्ट जनरेशन क्लासिक 350 त्याच प्लॅटफार्मवर तयार केले जात आहे ज्यावर कंपनीने मेटियर 350 बनवली होती.

 

मेटियर 350 चे इंजिन

नेक्स्ट जनरेशन क्लासिक 350 मध्ये रॉयल इनफील्ड तेच इंजिन देणार आहे जे मेटियर 350 मध्ये दिले गेले आहे. म्हणजे 349 सीसीचे इंजिन जे फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित असेल.

 

5 स्पीड गियरबॉक्स देणार

हे इंजिन 20.2 बीएचपीची कमाल पावर आणि 27 एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करू शकते. या इंजिनासह कंपनी 5 स्पीड गियरबॉक्स देणार आहे. तसेच फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रियर व्हिलमध्ये ड्रम ब्रेक दिला जाईल. दोन्ही टायर ट्यूबवाले आहेत. डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम सुद्धा मिळू शकते.

 

एकदम नवीन सस्पेन्शन सिस्टम

तसेच एकदम नवीन सस्पेन्शन सिस्टम दिली आहे. तिच्या एकदम नवीन इन्स्ट्रूमेंट कन्सोल दिले जात आहे.
ज्यासोबत सर्क्युलर हेडलँप, क्रोम प्लेटेड एग्झॉस्ट, फ्यूएल टँक ज्यास टियर ड्रॉप डिझाइन दिले आहे.
ट्रिप नेव्हिगेशन, क्रोज बेझल्ससारखी नवीन फीचर्स या बाईकमध्ये दिली आहेत.

 

सिंगल आणि ड्युअल सीट

यासोबतच या नेक्स्ट जनरेशन बाईकला रायडरचा आराम लक्षात घेऊन सिंगल आणि ड्युअल सीट व्हेरिएंटचा पर्याय दिला जाईल.
जेणेकरून दुरच्या प्रवासात सुद्धा थकवा जाणवणार नाही.

किंमत अंदाजे 1.80 लाख ते 2.05 लाख (Royal Infield Next Generation Classic 350 Price)
रॉयल इनफील्डने आतापर्यंत नेक्स्ट जनरेशन क्लासिक 350 च्या किमतीतबाबत कोणहीही घोषणा केलेली नाही.
परंतु जाणकारांचे म्हणणे आहे की कंपनी ही बाईक 1.80 लाख ते 2.05 लाखांच्या प्रारंभिक किंमतीवर लाँच करू शकते.

 

यांच्याशी होईल स्पर्धा

लाँच झाल्यानंतर या क्लासिक 350 नेक्स्ट जनरेशन बाईकची स्पर्धा जावा,
बेनेली इम्पिरियल 400 सोबत होणार असे मानले जात आहे.

Web Title : New Royal Enfield | royal enfield classic 350 next generation launched on september 1st know full details of features and price

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update