New Rules From September 2022 | 1 सप्टेंबर पासून होणार मोठे बदल, सर्वसामान्यांवर होणार परिणाम

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – New Rules From September 2022 | दोन दिवसांनंतर सुरू होणार्या सप्टेंबर महिन्यात खूप काही बदल पाहायला मिळणार आहेत. एकीकडे बैंकेचे नियम बदललेले असतील तर, दूसरी कडे स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही बदल होवू शकतील. अशा विविध प्रकारच्या बदलांनी नवीन महिना सुरू होणार आहे. (New Rules From September 2022)

 

असे असतील बदल

PNB KYC Updates
पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना KYC Update करण्या करीता 31 ऑगस्ट ही शेवटी तारीख दिली आहे. रिजर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडून वारंवार ग्राहकांना ही सूचना देण्यात येत होती. जर KYC Update केले नसेल तर ग्राहक आपल्या खात्यांमधुन पैशांचे व्यवहार करू शकणार नाहीत.

 

स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीतही बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेस पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल करू शकतात. त्यामुळे एक सप्टेंबरपासून सिलेंडच्या किंमतीही बदलण्याची शक्यता आहे.

Advt.

e-KYC PM Kisan
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकर्यांना e-kyc करायची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. असे न केल्यास शेतकर्यांचा पुढचा हफ्ता अडकू शकतो. (New Rules From September 2022)

 

इन्श्यूरन्स एजंटना कमी कमीशन
IRDAI ने जनरल इन्श्यूरन्सच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता इन्श्यूरन्स एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी 20 टक्केच कमीशन मिळणार आहे. त्यामुळे लोकांच्या पॉलिसीचा प्रिमीयम कमी होईल.

 

ऑडी कारच्या किंमतीही वाढणार
सप्टेंबर महिन्यात ऑडी खरेदी किंमत 2.5 टक्क्यांनी वाढणार आहे. या किंमती 20 सप्टेंबर पासून लागू होतील.