कुस्तीच्या ‘या’ नियमात मोठा बदल, खेळाडूंसह प्रशिक्षकही ठरणार दोषी

new-rules- in wrestling-

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुस्तीत जर एखादा खेळाडू डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र कुस्तीच्या नियमामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी खेळाडू दोषी आढळला तर त्याला काही वेळेपर्यंत बंदी आणि दंड भरावा लागतो तर काही वेळेला खेळाडूनंर आजीवन बंदी देखील घालण्यात येते मात्र यापुढे कुस्तीपटू दोषी आढळला तर मात्र त्याच्या प्रशिक्षकावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, ” जर एखादा कुस्तीपटू राष्ट्रीय शिबीरापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत डोपिंगमध्ये दोषी आढळला तर त्याचे प्रशिक्षकही दोषी ठरतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जर एखादा खेळाडू प्रशिक्षकाचे ऐकत नसेल, तर त्या प्रशिक्षकांनी ही गोष्ट महासंघाला कळवायला हवी. आम्हाला ही गोष्ट कळल्यावर आम्ही त्याच्यावर उचित कारवाई करू.” असे त्यांनी सांगितले.

भारतीय कुस्ती महासंघाचा निर्णय

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयकुस्तीपटू डोपिंगमध्ये दोषी आढळल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूंवर बंदीही घालण्यात आली. पण या प्रकरणांमुळे भारताच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ठपका बसल्याचे म्हटले गेले. त्यामुळे यापुढे जर कुस्तीपटू दोषी आढळला तर त्यासाठी प्रशिक्षकांनाही दोषी ठरवण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

खेळाडू, प्रशिक्षकाची जबाबदारी

खेळाडूंच्या डोपिंगमध्ये काहीवेळा प्रशिक्षकांचाही हात असल्याचे यापूर्वी म्हटले गेले आहे. त्याचबरोबर खेळाडूची मुख्यत्वेकरून जबाबदारी ही प्रशिक्षकांची असते. त्यामुळे आपला खेळाडू नेमका काय सेवन करतो, याकडे प्रशिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे असते. पण गेल्या काही वर्षांमध्ये मात्र भारतीय खेळाडू डोपिंगच्या विळख्यात अडकले गेल्याने भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like