ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी नवी योजना : महादेव जानकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ब्राह्मण ही जात अथवा धर्म नसून, ती व्यवस्था आहे. मात्र या समाजात ऐंशी टक्के गरिबी आहे. मग ब्राह्मणांनीही आरक्षण का मागू नये? ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी नवी योजना तयार केली जाईल, अशी घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. पुण्यात ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de3a17c1-c853-11e8-98c4-d3eca4ea85e2′]

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांना समाज भूषण पुरस्कार, महादेव जानकर यांना समाजमित्र पुरस्कार, अभिनेता स्वप्नील जोशी यांना युवा पुरस्कार, टेबल टेनिसपटू पूजा सहस्रबुद्धे यांना क्रीडा पुरस्कार, भालचंद्र कुलकर्णी यांना ब्राह्मण जागृती पुरस्काराने या वेळी गौरविण्यात आले. या प्रसंगी संघाचे संस्थापक अंकित काणे, उपाध्यक्ष रोहित जोशी, सह-सचिव रोहन जोशी, जिल्हाध्यक्ष अरविंद इनामदार उपस्थित होते.

दिलेली आश्वासने आता आठवतही नाहीत : नितीन गडकरी

जानकर म्हणाले, ब्राह्मण समाज हा दाता समाज असून या समाजात देशाचे राजकारण बदलण्याची ताकद आहे. सर्वसमावेशक नेतृत्व अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करून भविष्यात ते पंतप्रधानही होतील, अशी भविष्यवाणी जानकर यांनी व्यक्त करताच सभागृहाने जोरदार दाद दिली. ब्राह्मण समाजच देशाचे राजकारण बदलू शकतो. आम्ही एक असलो तरी लाखाला भारी आहोत, असेही ते म्हणाले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरqवद इनामदार म्हणाले, विधानसभेत एका पोलिसावर २५ आमदार हल्ले करतात. तब्बल तीस टक्के लोकप्रतिनिधींविरोधात गुन्हे दाखल आहेत, तर या देशाचे कसे होणार? या देशातील राजकारण्यांची भीती वाटते.

[amazon_link asins=’B01KHCQBAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed08fd65-c853-11e8-8a48-07dfaf8d0c71′]

पुरस्कार हा कलाकारांसाठी कौतुकाची थाप आहे, अशा भावना स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केल्या, तर कला आणि खेळांबद्दलचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, अशी अपेक्षा पूजा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.