भारतात 2019 मध्ये उच्च रक्तदाब सारख्या ‘या’ 5 आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नुकताच केलेल्या एका अभ्यासात भारतातील लोकांमधील मृत्यूच्या सर्वात मोठ्या करणाबाबत माहिती सापडली आहे. एका अहवालानुसार, गेल्या वर्षात म्हणजेच 2019 मध्ये देशात सर्वाधिक मृत्यू, वायू प्रदूषण, उच्च रक्तदाब, तंबाखूचा वापर, खराब आहार आणि उच्च रक्तातील साखरेमुळे झाला आहे.

हा अभ्यास शुक्रवारी वैद्यकीय जर्नल द लान्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आला असून संशोधकांनी मृत्यूची 286 कारणे, 369 आजार आणि जखमा संदर्भात 204 देश आणि प्रदेशातील 87 जोखीम घटकांचे विश्लेषण केले आहे. लठ्ठपणा, उच्च रक्तातील साखर, कोरोना विषाणू आणि वायू प्रदूषण यासारख्या आजारांमुळे सर्वात जास्त नुकसान झाल्याचे संशोधकांनी सांगितले. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, वायू प्रदूषणामुळे सुमारे 1.67 दशलक्ष मृत्यू झाले. त्यानंतर उच्च रक्तदाब, 1.47 दशलक्ष), तंबाखूचा वापर ( 1.23 दशलक्ष), खराब आहार ( 1.18 दशलक्ष) आणि हाय ब्लड शुगरमुळे ( 1.12 दशलक्ष) मृत्यू झाले आहेत.

भारतातील मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे संसर्गजन्य रोग 2019 साली इस्केमिक हृदयरोगाने 1.52 दशलक्ष, क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी रोगाने 8,98,000, स्ट्रोकमुळे 6,99,000, मधुमेहापासून 2,73,000 आणि सिरोसिस आणि यकृत रोगातून 2,70,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2019 मध्ये भारतातील एकूण आरोग्यास होणार्‍या नुकसानीसाठी मूल आणि माता कुपोषण हे मुख्य जोखीमचे घटक असल्याचे आढळले, वायू प्रदूषण हा दुसरा धोकादायक घटक आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, एकूण आजारापैकी 58 टक्के एनसीडी आजारांमुळे होते तर एनसीडीमुळे अकाली मृत्यू 22 ते 50 टक्क्यांहून अधिक झाले आहेत.

भारतात आयुर्मान 59.6 वरून वाढून 70.8 वर्षे

अहवालानुसार, भारतातील आयुर्मान 1990 पासून दशकापेक्षा जास्त वाढले आहे, 2019 मध्ये 59.6 वर्षाने वाढून 70.8 वर्षे झाले आहे. केरळमध्ये हे 77.3 वर्षे आहे तर उत्तर प्रदेशात ते 66.9 वर्षे आहे. दरम्यान, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशसारख्या शेजारच्या देशांमध्ये एनसीडी वाढल्यामुळे 1990 पासून एकूण आरोग्य नुकसानीचे प्रमाण (डीएएलवाय) 150 टक्क्यांहून अधिक झाले आहे, जे आता सर्व डीएएलवाय मधील निम्म्याहून अधिक योगदान देतात. अभ्यासात असे नमूद केले आहे की एकूणच, गेल्या तीन दशकांमधील हानिकारक जोखीम कमी करण्याचा विक्रम खराब आहे. संशोधकांनी असे मानले आहे की धूम्रपान कमी करून , सर्वसामान्यांना जोखीम घटकांच्या नुकसानीबद्दल माहिती प्रदान करून आणि इतर जोखमींबद्दल एक मजबूत धोरण तयार करून हे कमी केले जाऊ शकते.