सर्वेमध्ये खुलासा, आपल्या आयुष्यात सरासरी ‘इतक्या’ पार्टनरसोबत लैंगिक संबंध ठेवतो व्यक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही तुमच्या आयुष्यात किती व्यक्तींसोबत शारीरिक संबंध ठेवले आहेत? हा खुपच पर्सनल प्रश्न आहे आणि याचे उत्तर वेगवेगळे असू शकते. एका नव्या सर्वेक्षणात याचे उत्तर मिळाले आहे.

सर्वेत समजले आहे की, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात सरासरी किती पार्टनर सोबत लैंगिक संबंध ठेवतो. या सर्वेचे निष्कर्ष हैराण करणारे आहेत.

हेल्थकेयर कंपनी युरोक्लिनिक्सने युकेमध्ये 2,000 लोकांचे एक सर्वेक्षण केले आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांनी आपल्या आयुष्यात किती व्यक्तींशी लैंगिक संबंधी ठेवले.

निष्कर्षावरून समजले की, 25% लोकांनी आपल्या आयुष्यात 2 ते 4 व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवले. आश्चर्यकारक म्हणजे 14% लोकांनी म्हटले की, त्यांनी आपल्या आयुष्यात केवळ एकाच पार्टनरसोबत लैंगिक संबंध ठेवले.

यापैकी 2% लोक या बाबतीत थोडे जास्त सक्रिय होते आणि त्यांनी आपल्या आयुष्यात 91 पेक्षा जास्त पार्टनरशी शारीरीक संबंध ठेवले. केवळ 4% लोकांनी म्हटले की, त्यांना माहित नाही त्यांनी किती व्यक्तींशी लैंगिक संबंधी ठेवले.

गंमतीची बाब म्हणजे या बाबतीत 35 ते 44 वर्षाचे लोक सुद्धा कमी नाहीत. सर्वेत आढळले की, या वयाच्या सुमारे 3% लोकांचे 91 पेक्षा जास्त लैंगिक जोडीदार होते.