Corona Impact : 73% लोकांना खरेदी करायचीय नवीन गाडी, पब्लिक ट्रांसपोर्ट सुरक्षित नसल्याचे मत

नवी दिल्ली : वृतसंस्था –   भारतातील कोरोना व्हायरसने लोकांची जीवनशैली तसेच कार्य करण्याचे सामान्य मार्ग बदलले आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे देशातील संपूर्ण लोकसंख्या त्यांच्या घरात कैद झाली. फ्लाइट, गाड्या, जहाजे आणि रस्ते वाहतूकही बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणे त्रासदायक बनले. अशा परिस्थितीत लोकांनी वाहनांना प्राधान्य दिले. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) आणि ग्रँट थॉमसन इंडिया (जीटीआय) च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, अर्थव्यवस्था सुधारल्यास जवळजवळ 73 टक्के लोकांना नवीन वाहन खरेदी करायचे आहे.

29% 12 महिन्यांत तर 8 % 6 महिन्यांत नवीन कार खरेदी करण्याची आखतायेत योजना

सियाम आणि जीटीआयच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 29 टक्के लोक म्हणाले की, येत्या 12 महिन्यांत नवीन वाहन खरेदी करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचबरोबर, 8 टक्के लोक येत्या 6 महिन्यांत नवीन कार घेण्याचा विचार करीत आहेत. सद्य परिस्थिती लक्षात घेता, 56 टक्के लोकांनी विद्यमान वाहने वापरणे योग्य मानले. सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की कोविड 19 आधीपासून वाहन उद्योगावर संकट ओढवत आहे. कोरोना विषाणूमुळे या क्षेत्राची परिस्थिती आणखी वाईट झाली.

बरेच लोक सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासाला सुरक्षित मानत नाहीत

सर्वेक्षणात दोन स्पष्ट ट्रेंड आहेत. प्रथम, बहुतेक लोक वैयक्तिक वाहनांसह प्रवास करण्यास प्राधान्य देतात. असे लोक सार्वजनिक वाहतुकीतील प्रवासाला सुरक्षित मानत नाहीत. भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचा परिणाम लोकांच्या नव्या चिंतेत कायम आहे. यामुळे लोक नवीन वाहन खरेदी करण्यास मागेपुढे पाहत आहेत. दुसरे म्हणजे, कोविड -19 मुळे पूर्वी ज्यांनी वाहन विकत घेतले नाही, त्यांना आता स्वतःचे वाहन खरेदी करायचे आहे. सर्वेक्षण दरम्यान मेट्रो आणि नॉन मेट्रो शहरांमधील 57 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना दररोज प्रवास करण्यासाठी प्रवासी वाहने वापरायची आहेत.

20% लोकांची लोकल क्षेत्रात प्रवास करण्यासाठी दुचाकी खरेदी करण्याची इच्छा

अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या 20 टक्के लोकांनी असे सांगितले की, दुचाकी मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. त्याच वेळी, 20 टक्के लोक इलेक्ट्रिक वाहन (ई-वाहन) खरेदी करण्याची योजना आखत आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 68 टक्के लोकांना शोरूममध्ये जाऊन वाहन खरेदी करायचे आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून 25 टक्के लोकांनी ऑनलाइन वाहने खरेदी करण्यास प्राधान्य दिले. या व्यतिरिक्त 7 टक्के लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वाहनाच्या निवडीविषयी बोलले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like