Coronavirus : डॉक्टरांनी सांगितले COVID-19 संसर्गाची नवीन ‘लक्षणं’, तुमच्या पायावर देखील ‘असे’ झाले नाही ना ?

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  जगात दररोज हजारो लोक कोरोना विषाणूचे शिकार होत आहे. आतापर्यंत जगभरात 1 लाख 43 हजारांहून अधिक लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत. ही संख्याही भारतात वेगाने वाढत आहे. रुग्णांमध्ये कोरोनाच्या लक्षणांबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. सामान्यत: तीव्र आणि सतत ताप, कोरडा खोकला आणि सर्दी अशी लक्षणे यामध्ये दिसतात. परंतु आता, कोरोनाच्या लक्षणांबद्दल, डॉक्टरांनी म्हटले आहे की. हा विषाणू पायांद्वारे देखील आपल्याला निशाणा बनवू शकतो.

ही आहेत नवीन लक्षणे

स्पॅनिश डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूचा परिणाम पायांवरही दिसू लागतो. काही रुग्णांच्या पायाच्या त्वचेवर जखमा होतात. स्पॅनिश त्वचारोग तज्ञांनी असा इशारा दिला आहे की, कोविड -19 च्या अनेक रुग्णांना एकाच वेळी जांभळ्या रंगाची जखम पायावर दिसू लागली आहे. या जखमा सामान्यत: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये दिसतात. डॉक्टरांच्या मते, कधीकधी या जखमा चिकन पॉक्सच्या चिन्हासारखे दिसतात. अशा जखमा बोटांच्या सभोवतालात उद्भवतात.

सध्या अशा जखमा का उद्भवतात यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु डॉक्टरांनी लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. त्यांच्या मते, जर अशा जखमा पायावर दिसल्या तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

ही देखील लक्षणे आहेत

यापूर्वी, ब्रिटन आणि अमेरिकेच्या तज्ञ डॉक्टरांच्या गटाने असा दावा केला आहे की, जर एखाद्या व्यक्तीने अचानक वास घेण्याची शक्ती गमावली असेल किंवा त्यांना वास येत नसेल असेल तर त्याला कोरोना विषाणूची लागण होण्याची शक्यता असते.