New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल टीडीएस! आजपासून लागू झाले नवीन नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New TDS Rules | टीडीएसशी संबंधित नियमांमधील बदल 1 जुलैपासून लागू झाले आहेत. आता सोशल मीडिया इनफ्लुएन्सर्सला सुद्धा 10 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन धोरणाचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) कलम 194R शी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (New TDS Rules)

 

नवीन तरतुदी त्या लोकांवर लागू होतील जे एखाद्या आर्थिक वर्षात 20,000 रुपयांपेक्षा जास्त लाभ किंवा इतर सुविधा देतात. हे पेमेंट व्यावसायिक लाभ किंवा इतर सुविधांसाठी असावे.

 

16 जून रोजी जारी केले परिपत्रक
सीबीडीटीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्षात 20,000 रुपयांपेक्षा जास्त लाभ, साहित्य किंवा पेमेंटवर भरणा करणार्‍यांना 10 टक्के कर कापावा लागेल.

 

टीडीएस कपातीवर या गोष्टीचा काही फरक पडणार नाही की, दिलेला लाभ रोख आहे
किंवा इतर कोणतीही भौतिक सामग्री किंवा दोन्हीचे मिश्रण आहे.

 

सीबीडीटीने म्हटले की हे लाभ, कर्जमाफी, भाडेमुक्त निवास, फर्निचर, जमीन, कार किंवा इतर भेटवस्तू असू शकतात. मात्र, विक्रेत्याकडून एमआरपीवर दिली जाणारी सवलत आणि रिबेटला यातून वगळण्यात आले आहे. (New TDS Rules)

यावर कापला जाऊ शकतो टीडीएस
परिपत्रकात असे सांगण्यात आले आहे की आणखी काही गोष्टी आहेत ज्यावर टीडीएस कपातीचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्यूशन, स्पॉन्सर्ड ट्रिप्स, इव्हेंटची फ्री तिकिटे, डॉक्टर किंवा इतर मेडिकल प्रॅक्टिशनरला फ्री सॅम्पल मेडिसिन इत्यादी यामध्ये समाविष्ठ होऊ शकतात. अशी कोणतीही संस्था जी बिझनेस करत नाही, जसे की सरकारी हॉस्पिटलला लाभ दिल्यास टीडीएस कापला जाणार नाही.

 

इनफ्लुएन्सर्स संदर्भात टीडीएस
जर एखाद्या कंपनीने सोशल मीडियावरील व्यक्तिमत्व किंवा इनफ्लुएन्सरला प्रमोशनसाठी प्रॉडक्ट दिले
आणि त्याने ते त्याच्याकडे ठेवले तर त्यावर टीडीएस कापला जाईल.
मात्र, प्रॉडक्टचा वापर झाल्यानंतर परत केल्यास टीडीएस कापला जाणार नाही.

 

बिझनेस कॉन्फरन्सवर टीडीएस
जर नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी किंवा उत्पादनाविषयी शिक्षण देण्यासाठी कॉन्फरन्स आयोजित केली जात असेल तर टीडीएस आकारला जाणार नाही.
मात्र, विशिष्ट टार्गेट साध्य करण्यासाठी डीलर्सना देण्यात येणारे इन्सेंटिव्ह आणि बेनिफिटसाठी आयोजित कॉन्फरन्सवर टीडीएस आकारला जाईल.

 

Web Title :- New TDS Rules | new tds rules now influencers will also have to pay tds new rules come into effect from today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | ‘आरे’ प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंचं नव्या सरकारला आवाहन; म्हणाले – ‘माझ्या पाठीत वार करा, पण…’

 

Maharashtra Assembly Speaker Election | विधानसभेचे नवे अध्यक्ष कोण?; राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा, पण कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

 

Pune Crime | शिवीगाळ का करतो, असे विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न