उद्यापासून सांभाळून करा ‘ड्रायव्हिंग’, नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट दंड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून 1 सप्टेंबर 2019 रोजी, देशभरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत नवीन नियम लागू होत आहेत. नवीन नियम अंमलात आल्यानंतर, नियम मोडल्यास तुम्हाला 10 पट दंड भरावा लागेल. प्रवास सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन दुरुस्ती अधिनियम 2019 च्या माध्यमातून अलीकडेच अनेक नियम बदलले आहेत. सुरक्षित वाहतुक व्यवस्था राखण्यासाठी दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणता नियम मोडल्यास किती दंड द्यावा लागणार याविषयी –

1) सीट बेल्ट लावला नाही तर आता 300 रुपयांऐवजी 1000 दंड द्यावा लागणार आहे.
2) दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्ती असतील तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.
3) हेल्मेट न घातल्यास 200 ऐवजी 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द केले जाईल.
4) रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनाला मार्ग न दिल्यास 10,000 रुपये दंड होईल. यासाठी आत्तापर्यंत दंड आकारण्याची तरतूद नव्हती.
5) परवान्याशिवाय वाहन चालविल्यास 500 च्या ऐवजी 5 हजारांचा दंड केला जाईल.
6) लायसन्स रद्द झाल्यानंतरही वाहन चालविण्यास 10 हजार रुपये दंड होईल. आतापर्यंत या नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड करण्याची तरतूद होती.
7) ओव्हरस्पीडवरील दंड 400 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे. तर दुसरीकडे धोक्याची ड्रायव्हिंग करणाऱ्यावर दंडाची रक्कम 5000 पर्यंत करण्यात आली आहे. यापूर्वी 1000 रुपये दंड आकारला जात होता.
8) ड्रायव्हिंग करताना शर्यत लावल्यास 5000 पर्यंत दंड आकारण्यात येईल. यापूर्वी 500 रुपये दंड आकारला जात होता.
9) दारूच्या नशेत वाहन चालवल्याप्रकरणी 2000 ऐवजी 10 हजार दंड आकारण्यात येईल.
10) वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना आढळल्यास 1000 ऐवजी 5000 रुपये दंड होईल.
11) परमिट नसलेल्या वाहनावर 5000 च्या ऐवजी 10 हजार रुपये दंड आकारला जाईल.
12) ओव्हरलोडिंगसाठी 2000 रुपये दंड आणि निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वजनासाठी 2000 रुपये दंड आकारण्यात येईल. आतापर्यंत 2000 रुपये आणि जास्त वजनावर प्रति टन 1000 रुपये दंड आकारण्यात येत होता.
13) इन्शोरन्सशिवाय वाहन चालविण्यास 1000 रुपये असणारा दंड 2000 पर्यंत वाढविण्यात आला आहे.
14) जर अल्पवयीन मुलगा वाहन चालवत असेल तर गाडी मालक आणि त्या अल्पवयीन मुलाचे पालक दोघांनाही दोषी मानले जाईल. त्यासाठी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन 25 वर्षांचा होईपर्यंत त्याला ड्रायव्हिंग लायसेन्स देण्यात येणार नाही. आतापर्यंत या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती.

आरोग्यविषयक वृत्त –