SSR Case : रिया पाठोपाठ श्रृती मोदी ED कार्यालयात हजर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ईडीकडूनही रियाची चौकशी सुरु आहे. रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयात पोहचल्यानंतर त्या पाठोपाठ आता श्रृती मोदीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी घडामोडींना वेग आला आहे. तब्बल 50 हूनअधिक दिवसांनी या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. सीबीआयने तक्रार दाखल केल्यानंतर ईडीनेही चौकशीला सुरुवात केली आहे. आज (शुक्रवार) दुपारी रिया चक्रवर्ती नाही हो, म्हणत अखेर ईडी कार्यालयात चौकशीला हजर झाली आहे. या प्रकरणी मनी लॉर्ड्रिंगचा संशय आहे. त्यानुसार ही चौकशी सुरु आहे.

रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी श्रृती मोदीलाही चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. पटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या केससह सीबीआय चौकशीमध्ये श्रृतीचे नाव आहे. त्याचप्रमाणे सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला देखील समन्स पाठवल्याची माहिती समोर येत आहे.

कोण आहे श्रृती मोदी ?

सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर श्रृती मोदी हे देखील नाव आहे. यानंतर श्रृती आणि सुशांतच्या आत्महत्येशी काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. दरम्यान, श्रृती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. सुशांतच्या कंपनीत रिया-शोविकचे सर्व काम श्रृती पहात होती. यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like