Kappa variant | डेल्टानंतर आता आला कोरोनाचा नवीन कप्पा व्हेरिएंट, जाणून घ्या याची लक्षणे आणि कसे पडले याचे नाव

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाचा नवीन Kappa variant यूपीत आढळला आहे ज्याने तज्ज्ञ आणि डॉक्टरांची झोप उडवली आहे. काही आठवड्यांपूर्वी कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट समस्या बनला होता आता कोरोनाचा नवा व्हायरस कप्पा व्हेरिएंट समोर आला आहे.

यूपीत आढळला Kappa variant
देवरिया आणि गोरखपुरमध्ये डेल्टा प्लस स्ट्रेन (Delta plus strain) ची दोन प्रकरणे आढळल्यानंतर आता संत कबीर नगर (Sant Kabir Nagar) मध्ये एक रूग्ण कोविड-19 (Covid-19) च्या कप्पा स्ट्रेनने पॉझिटिव्ह आढळला आहे. 66 वर्षीय रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान हा स्ट्रेन आढळला. यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे हा व्हेरिएंट घातक ठरू शकतो.

काय आहे कप्पा व्हेरिएंट ? Kappa variant
तज्ज्ञांनुसार कप्पा व्हेरिएंट पँगो वंशाशी नाते ठेवतो. या वंशाला 1.617 च्या नावाने ओळखले जाते. त्याच्या तीन उपवर्गापैकी एक कप्पा व्हेरिएंट आहे. कप्पा व्हेरिएंटला बी.1.617.1 चे नाव दिले गेले आहे जो पहिल्यांदा भारतात डिसेंबर 2020 मध्ये आढळला होता.

जाणकारांनुसार E484Q आणि E484K व्हेरिएंट्समुळे कप्पा व्हेरिएंटचे रूप समोर आले आहे. या म्यूटेशनमध्यमे L452R म्यूटेशनचा सुद्धा हात आहे, ज्यामुळे आपली इम्यून सिस्टम कमजोर पडते.

असे पडले कप्पा नाव
काही काळापूर्वी जागतिक आरोग्य संघटने (World Health Organization) ने ही घोषणा केली होती की आतापासून कोविड-19 (Covid-19) च्या नवीन स्ट्रेनचे नाव ग्रीक अल्फाबेटिकल लेबल्सच्या नावावरून ओळखले जाईल. यावरूनच ज्या स्ट्रेनचे मूळ भारत आहे त्यांचे नाव डेल्टा आणि कप्पा ठेवले जाईल आणि कप्पा व्हेरएंट पहिल्यांदा भारतात डिसेंबर 2020 मध्ये आढळला होता यासाठी त्याचे नाव कप्पा ठेवले आहे. दुसरीकडे ब्रिटनच्या वंशाच्या स्ट्रेनचे नाव अल्फा ठेवले जाईल.

ही आहेत कप्पाची लक्षणे
तज्ज्ञांनुसार, कोरोना व्हायरसच्या कप्पा व्हेरिएंटने पीडित लोकांमध्ये खोकला, ताप, घशात खवखव अशी प्राथमिक लक्षणे दिसू शकतात. तर हलकी आणि गंभीर लक्षणे कोरोना व्हायरसच्या इतर म्यूटेंट्सच्या लक्षणाप्रमाणे असतील. या व्हेरिएंटबाबत आणखी संशोधन सुरू आहे, याबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते.

कप्पा व्हेरिएंटपासून असा करा बचाव

– तज्ज्ञांनुसार, कप्पा व्हेरिएंटपासून डेल्टा व्हेरिएंटपर्यंत, कोणत्याही व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी मास्कचा वापर सर्वात आवश्यक आहे.
– गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांपासून दूर रहा.
– वेळोवेळी हात धुवत रहा आणि इम्यूनिटीकडे विशेष लक्ष द्या.
– जर तुम्हाला कोरोना व्हायरसची लक्षणे दिसत असतील तर उशीर न करता स्वताला क्वारंटाइन करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– टेस्टच्या नंतर जर कोरोना पॉझिटिव्ह आढळलात तर डॉक्टरांनी सांगितलेले उपचार सुरू करा.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : new variant of coronavirus in india kappa variant know its symptoms kappa variant kya hai

हे देखील वाचा

 

Anti Corruption Trap | साडे सात लाख रुपयांच्या लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह
2 अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; राज्य पोलीस दलात खळबळ

पोलीस निरीक्षक संपत पवार यांची या पूर्वी पुण्यातील गुन्हे शाखेत आणि
दत्तवाडी पोलीस ठाण्यात नोकरी झाली आहे

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात;
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान