New Version BGMI | एक वर्षानंतर BGMI गेम भारतात पुन्हा खेळता येणार; पण ‘हे’ आहेत काही नियम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – New Version BGMI | भारतीय तरुणांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेली बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया म्हणजेच BGMI पुन्हा एकदा नव्या रुपात व नव्या नियमांसह आली आहे. काही वर्षांपूर्वी PUBGI या गेमवर भारतीय सरकारतर्फे बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षापूर्वी BGMI गेमिंग अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली होती. याने देखील सर्वांना वेडे लावले होते. अनेक तक्रारींनंतर गेल्यावर्षी BGMI वर भारतात (India) एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. आता मात्र युजर्सची (Users) प्रतिक्षा संपली असून त्यांना BGMI हे ॲप प्ले स्टोरवरून (Play Store) डाउनलोड करता येणार आहे. (New Version BGMI)

एक वर्षासाठी बंदी घालण्यात आलेल्या BGMI ला आता काही नियमांसह भारतीय बाजारात (Indian Market) परवानगी दिली आहे. भारतीयांना खेळाचा आनंद घेता यावा म्हणून युजर्ससाठी Krafton ने 2.5 या नवीन अपडेटची घोषणाही केली आहे. BGMI कडून भारतीय युजर्ससाठी हे खास नवीन व्हर्जन BGMI Update) उपलब्ध करून देण्यात आहे. मात्र वापरकर्त्यांना काही अटी व नियमांचे (Rules For BGMI) पालन करणे गरजेचे असणार आहे.

आता BGMI खेळताना युजर्सना वेळेचं बंधन (Time Limit BGMI) पाळावं लागणार आहे. 18 वर्षांखालील
सर्व मुलांसाठी एक टाईम लिमिट सेट करण्यात आली आहे.
यामुळे या मुलांना टाईम लिमिट संपल्यानंतर BGMI खेळता येणार नाही. याविषयी Krafton ने स्पष्ट केले आहे की,
आम्ही या खेळाला पूर्ण जबाबदारीने प्रोत्साहित करत आहोत.
यामुळे 18 वर्षांखालील सर्व मुलांना खेळासाठी 3 तासांचे टाईम लिमिट असेल तर इतर BGMI युजर्सना दिवसभरात
6 तास गेम खेळता येणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुलांना गेम खेळताना आई-वडिलांच्या परवानगीची
आवश्यकता लागणार आहे.

अँड्रॉइड वापरकर्त्यांना (Android Users) प्ले स्टोरवरून BGMI असे सर्च करून अ‍ॅप डाउनलोड करता येऊ शकते.
यानंतर आयफोन युजर्ससाठी (iPhone Users) हे अ‍ॅप उपलब्ध होऊ शकत नव्हते मात्र, आजपासून म्हणजे 29
मे रोजी आयफोन युजर्सना BGMI अ‍ॅपल स्टोरवरून (Apple Store) डाऊनलोड करता येणार आहे.
तसेच हे अॅप डाउनलोड (BGMI Download) केल्यानंतर युजर्सना 48 तासाची वाट पाहावी लागणार आहे.
यानंतर सर्व युजर्सना BGMI गेम खेळता येणार आहे. (New Version BGMI)

Advt.

Web Title :  New Version BGMI | After a year BGMI game will be playable again in India; But ‘these’ are some rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंची लाचारी!!’, ‘ते’ फोटो ट्विट करत भाजपचा टोला

Pune PMC News | पुणे महानगरपालिका : तुमच्या भागातील नाले सफाईची कामे झाली नसतील तर ‘या’ 2 मोबाईलवर संपर्क साधा, जाणून घ्या नंबर

Adipurush Cinema | आदिपुरूष चित्रपटाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; अवघ्या तासाभरात केला मिलियनस टप्पा पार (VIDEO)