New Wage Code | वेतन वाढीच्या आनंदावर ‘टाच’ येण्याची शक्यता; हाताशी येणार्‍या पगारात कपात?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन वेतन कोड (New Wage Code) लागू झाल्यानंतर तुमची टेक होम सॅलरी (Take home salary) कमी होऊ शकते. सोबतच तुमच्यावरील कराचा बोजादेखील वाढू शकणार आहे. त्यामुळे कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वाढवलेल्या वेतनानंतर (salary structures employees) आता फरक पडण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (New Wage Code)

 

कुठल्याही कामगारांची बेसिक सॅलरी (Basic Salary), हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) , PF, ग्रॅच्युटी आणि पेन्शन (Pension) यासारखे सेवानिवृत्तीचे फायदे आणि कर वाचवणारे भत्ते अर्थात LTA आणि मनोरंजन भत्ता यांचा Cost To Company म्हणजेच कंपनीला खर्चामध्ये समावेश होतो. नव्या वेज कोडनुसार (New Wage Code), एकूण वेतनामध्ये भत्त्यांचं प्रमाण कोणत्याही स्थितीत 50 टक्क्यांहून जादा ठेवता येणार नाही.

 

एखाद्या कामगाराचे वेतन (Salary) पन्नास हजार रुपये (Fifty thousand rupees) असल्यास त्यांचे मुळ वेतन २५ हजार असायला हवी आणि बाकी 25 हजारांत त्याचे सर्व भत्ते असायला हवे आहेत. सध्याच्या घडीला अनेक कंपन्या बेसिक सॅलरी 25 ते 30 टक्के ठेवतात आणि बाकी रकमेचा समावेश भत्त्यांमध्ये करतात. परंतु, आता या कंपन्या बेसिक सॅलरी 50 टक्क्यांपेक्षा कमी ठेऊ शकणार नाही. नवे वेज कोड नियम लागू करताना भत्त्यांमध्ये कपातही करावी लागणार आहे. (New Wage Code)

तर, भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) आणि उपदान यांचा थेट संबंध मुळ वेतनशी असतो. मुळ वेतन वाढल्यावर भविष्य निर्वाह निधी आणि उपदानदेखील वाढेल. त्यामुळे कामगारांची टेक होम सॅलरी कमी होणार आहे. परंतु, भविष्य निर्वाह निधी आणि उपदान वाढल्यानं निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम वाढणार आहे. तर, समजा, एखाद्या कामगाराचे वेतन 1 लाख रुपये आहे. त्याचे मुळ वेतन सध्या 30 हजार आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघेही भविष्य निर्वाह निधीमध्ये 12-12 टक्के योगदान देतात. दोघांचंही योगदान 3600 रुपये आहे. तर कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी 92 हजार 800 रुपये होते. पण, आता मुळ वेतन 50 हजार होईल. यावरुन येणारा पगार हा 88 हजार रुपये असणार आहे, म्हणाजेच पगार कमी मिळेल.

 

Web Title :- New Wage Code | new wage code will change salary structures employees likely implement 2022 see here how

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PF Account | पीएफ खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा लाभ; कसे काढाल पैसे? जाणून घ्या सोपा मार्ग

Jalgaon Crime | दुर्दैवी ! शाळेत जाताना दोन सख्ख्या भावांना बसनं चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी संघर्ष

Jayant Patil-Devendra Fadnavis | जयंत पाटलांचा निशाणा; म्हणाले – ‘देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख’ (VIDEO)