मराठी “बिग बॉस” च्या घरात येणार नवी वाईल्ड कार्ड एंट्री

मुंबई:वृत्तसंस्था

बिग बॉस हिंदी असो किंवा मराठी बिग बॉस म्हंटले की चर्चा होतेच .सध्या महाराष्टभर गाजणारा नवा रिअलिटी शो मराठी बिग बॉस खूपच गाजतो आहे. नुकतेच बिग बॉस च्या घरातून राजेश शृंगारपुरे ची एक्झिट झाली. आता ही बातमी ताजी असतानाच बिग बॉसच्या घरात आणखी एक वाईल्ड कार्ड एण्ट्री होणार आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत बिग बॉसच्या घरात येणार असल्याची चर्चा आहे. तशी विचारणा शर्मिष्ठाला कलर्स वाहिनीकडून करण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात अभिनेत्री हर्षदा खानविलकर ही सुद्धा वाईल्ड कार्डद्वारे बिग बॉसच्या घरात आली आहे. त्यानंतर आता अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतही तशीच एण्ट्री करण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शर्मिष्ठा म्हणाली,” मला बिग बॉसबाबत विचारणा झाली आहे. मात्र मी अजून हो की नाही हे कळवलेलं नाही. बिग बॉसच्या घरात मोबाईल किंवा काहीही न घेता राहाणं जमेल का, सध्याचं वातावरण, माझी प्रतिमा या सर्वाचा मी विचार करत आहे” तेव्हा आता शर्मिष्ठाची एंट्री बिग बॉस च्या घरात होणार की नाही हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.