2020 : 1 जानेवारी रोजी जगभरात जन्मली 3,92,078 मुलं, भारतात ‘सर्वाधिक’, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  नववर्षाला काल (१ जानेवारी) पासून सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जगभरात जन्मलेल्या मुलांपैकी 17 टक्के मुलांचा जन्म भारतात झाला आहे. युनिसेफने वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या मुलांचा डेटा जारी केला. त्या आकडेवारीनुसार, 01 जानेवारी 2020 रोजी जगभरात एकूण 3,92,078 मुले जन्माला आली.

यात भारतात सर्वाधिक 67,385 एवढी मुले जन्माला आली. त्याखालोखाल चीन, नायजेरिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, अमेरिका, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि इथिओपिया आहेत. तसेच जगात जन्मलेल्या एकूण मुलांपैकी 50 टक्के मुले या आठ देशांमध्ये आहेत. अंदाजानुसार 2020 मधील प्रथम मुलाचा जन्म पॅसिफिक प्रदेशातील फिजीमध्ये झाला. तर पहिल्या दिवशी जन्मलेला शेवटचा मुलगा अमेरिकेत असेल. 1 जानेवारी रोजी जगभरात जन्मलेल्या मुलांची संख्याः

1. भारत – 67,385
2. चीन – 46,299
3. नाजीरिया – 26,039
4. पाकिस्तान – 16,787
5. इंनडोनेशिया – 13,020
6. अमेरिका – 10,452
7. कॉंगो लोकतांत्रिक गणराज्य – 10,247
8. इथियोपिया – 8,493

2018 मध्ये, जन्माच्या पहिल्या महिन्यात 25 लाख नवजात मुलांनी आपला जीव गमावला. यापैकी जवळजवळ एक तृतीयांश मुले त्यांच्या जन्माच्या दिवशी मरण पावली. यातील बहुतेक मुले अकाली जन्म, प्रसूती दरम्यान गुंतागुंत आणि सेप्सिर सारख्या संसर्गामुळे मरतात. युनिसेफ या कारणांना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या व्यतिरिक्त दरवर्षी अडीच दशलक्षाहूनही अधिक मुले मृत जन्म घेतात. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत या आकडेवारीत बरीच सुधारणा झाली आहे. पाच वर्षांच्या आधी मरण पावलेल्या अशा मुलांची संख्या निम्म्यावर आली आहे. परंतु नवजात मुलांबाबतची प्रगती मंद आहे.

2018 मध्ये, पाच वर्षाखालील 47 टक्के अर्भकांचा जन्म दिवशी मृत्यू झाला. सन 1990 मध्ये ही संख्या 40 टक्के होती. युनिसेफने आपल्या ”Every Child Alive’ या मोहिमेद्वारे, प्रत्येक आई व नवजात मुलाची काळजी घेण्यासाठी आणि गर्भधारणेदरम्यान, बाळाचा जन्म आणि जन्मादरम्यान होणारी गुंतागुंत रोखण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेऊन आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये त्वरित गुंतवणूक करावी, असे आवाहन युनिसेफने केले आहे.

यूएन एजन्सीचे कार्यकारी संचालक हेनरीएटा फोर यांनी सांगितले की, बर्‍याच माता आणि नवजात मुलांची काळजी प्रशिक्षित दाई किंवा नर्सकडून घेतली जात नाही, त्यामुळे हा भयंकर परिणाम झाला आहे. आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की, लाखो मुले त्यांच्या पहिल्या दिवसापासून जिवंत राहू शकतील आणि पुढेही उत्तम आयुष्य जगातील.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/