मनःशांती-आरोग्य-आनंद मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – दरवर्षी आपण नव्या वर्षाच्या स्वागतासोबतच एखादा नवा संकल्प कतो. काही लोक हा संकल्प पूर्ण करतात. तर, काही लोक मात्र चार दिवसांनी आपला संकल्प विसरून जातात. मात्र, २०२० मधील कोरोनाची परिस्थिती पाहता सगळ्यांनाच निरोगी जीवनाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी नव्या वर्षात स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यामुळे तुम्ही देखील असाच संकल्प केला असेल, तर ‘या’ काही टिप्स नक्कीच तुमच्या कामी येतील

२०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात आरोग्य ही सगळ्यात मोठी चिंता आहे. देशच नव्हे तर, संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या वर्षाने आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे आरोग्याविषयी जागरूकता. यामुळेच येत्या नवीन वर्षात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फिटनेसकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करावे लागतील. चला तर त्या बदलांविषयी जाणून घेऊया…

लवकर उठा आणि चालण्याचा व्यायाम करा.
किमान १५ मिनिट चालणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. दररोज चालण्याचा व्यायाम करून तुम्ही मधुमेह, हृदयरोगासारख्या आजारांना टाळू शकता त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून किमान १५ मिनिटे चालण्यासाठी जा.

व्यायाम करा
व्यायाम केवळ खुल्या मैदानात किंवा जिममध्येच केला जाऊ शकतो. असे बहुतेक लोकांना वाटते. परंतु, कोरोनामुळे आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता आपण घरच्या घरी व्यायाम आणि योगा करू शकता. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपण घरीच पुशअप्स, चेस्ट फ्लाय, स्क्वॉट्स करू शकता. याशिवाय स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण योगासने देखील करू शकता.

भरपूर पाणी प्या
पाणी पिणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज किमान ४ ते ५ लिटर पाणी प्या. पाणी पिण्यामुळे तुमचे शरीर डीटॉक्स होते आणि डिहायड्रेट होत नाही. तसेच, शरीर ऊर्जा मिळते.

पुरेशी झोप घ्या
चांगल्या आरोग्यासाठी दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक असते. सकाळी लवकर उठणे आणि नियमित व्यायाम केल्याने आपल्याला चांगली झोप यायला मदत होईल. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या निर्माण होतात. शिवाय कामात लक्ष लागत नाही आणि चिडचिड होते.