New Year 2022 | नवीन वर्षात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपले आर्थिक नियोजन कसे करावे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – New Year 2022 | येणारे वर्ष चांगले आणि आनंदी होण्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे, यामध्ये आपण बचत आणि गुंतवणूक करतो. विद्यार्थी आणि नोकरदार लोक नवीन वर्षात (New Year 2022) फायनान्स प्लॅनिंग करू शकतात. गुंतवणूकदारांनी हे नीट समजून घेणे आणि योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक बाबी जाणून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करण्यासाठी आजच्यापेक्षा जास्त गंभीर वेळ कधीच आली नाही म्हणून जाणून घ्या आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि नवीन वर्षात त्यासंदर्भात आमची योजना काय असावी याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स.

इमर्जन्सी फंड (Emergency Fund)

SEBI इन्‍वेस्‍टमेंट सल्लागार जितेंद्र सोलंकी (jitendra solanki) म्हणतात की, कोणीही फिक्स्ड डिपॉजिट किंवा सुरक्षित फिक्स्ड-इन्कम फंड द्वारे इमर्जन्सी फंड केला पाहिजे. ज्याने कमीत कमी सहा महिने तर खर्च भागला पाहिजे. विद्यार्थी आणि नोकरदार दोघांसाठी ते आवश्यक आहे. इमर्जन्सी फंड असेल तर अल्पकालीन उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत होईल आणि नोकरी गमावणे, वैद्यकीय आणीबाणी इत्यादीसारख्या अचानक येणाऱ्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या मदत होऊ शकते.

आर्थिक हेतू ठरवा

जितेंद्र सोळंकी म्हणतात, नोकरी करणाऱ्यांनी दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करा ध्येय निश्चित झाल्यावर गुंतवणूक करणे सोपे जाईल. म्युच्युअल फंड जास्त मुदतीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. तुमच्याकडे अल्प कालावधीसाठी बँक ठेवींचा पर्याय आहे. (New Year 2022)

 

 

बजेट तयार करा

तज्ज्ञ जितेंद्र सोळंकी म्हणाले, सर्व खर्च आणि प्राप्तीसाठी ध्येय स्पष्ट असावे. रोख पावत्यांमध्ये पगाराचे उत्पन्न, संपत्तीच्या भाड्याने मिळणारे उत्पन्न, पोटगीची रक्कम, कोणतीही मदत इत्यादींचा समावेश होतो. खर्चामध्ये कर्ज, गहाण, EMI इत्यादी सर्व खर्चांचा समावेश होतो. बजेट बनवल्यास सर्वकाही समजण्यास सहज मदत होईल.

कर्ज फेडणे

सोलंकी यांच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्डच्या कर्जावरील व्याजदर जास्त आहे तर विद्यार्थी कर्जावर ते कमी आहे. तुमची कर्जे किती आहेत हे लक्षात ठेवा आणि त्यांची वेळेवर परतफेड करा. प्रथम सर्वात जास्त व्याजदर सह कर्ज फेडा.

आरोग्य विमा योजना

नोकरदार आणि विद्यार्थी या दोघांनीही आरोग्य विमा योजनेचा
विचार केला पाहिजे. जितेंद्र सोलंकी म्हणतात, तुम्हाला हवे
असल्यास तुम्ही एलआयसीचा प्लॅन घेऊ शकता. विमा ही
अशी योजना आहे ज्याचा लाभ तुमच्याकडे पैसे नसताना
आणि जेव्हा तुम्हाला त्याची गरज भासत असताना मिळतो.
जर तुम्हीही LIC घेतली असेल तर तुमच्या कुटुंबाला कठीण परिस्थितीत त्याचा फायदा होऊ शकतो.

Web Title :- New Year 2022 | financial investment planning tips for students and salaried person in 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mukesh Ambani Reliance | मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे उद्योग जगताचे लक्ष

Uddhav Thackeray-Bhagat Singh Koshyari | मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ पत्रावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची तीव्र नाराजी

Airtel Prepaid Offers | एअरटेलनं दिली नववर्षाची भेट ! ‘या’ Prepaid Plans वर डिस्काऊंट आणि इतर फायदे