Restrictions in Maharashtra | राज्यातील कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | राज्यात कोरोना (Corona Virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटने (Omicran Variant) चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. दैनंदिन कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात 82,000 इतकी कोरोना रूग्णांची संख्या आहे. यातच महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णांची (Coronavirus in Maharashtra) संख्या वाढत आहे. आज मुंबईत तर कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्स, मंत्र्यांची बैठक (Restrictions in Maharashtra) घेण्यात आली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचलीय. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. यावरुन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असं टोपे म्हणाले. (Restrictions in Maharashtra)

 

पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी म्हटलं आहे. टेस्टींग संदर्भात एचडीटीएफ कीटचा वापर करण्याचे ठरले आहे. लसीकरणाबाबतही (Vaccination) निर्णय घेण्यात आला असून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी, शाळा किंवा कॉलेज बंद न करता विशेष मोहिमेतून त्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title :- Restrictions in Maharashtra | mumbais positivity rate 848 rajesh tope has-clearly stated about restrictions corona and omicron covid

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवार पुन्हा संतापले; म्हणाले – ‘मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार’

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलिस ठाण्यातील PSI सह दोघांवर गुन्हा

Wedding Insurance | कोरोनामध्ये लग्न रद्द झाले असेल तर परत मिळतील पैसे, ₹ 7500 मध्ये 10 लाखांपर्यंत विमा कव्हर; जाणून घ्या

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

 

Deccan Queen Express | पुणे-मुंबईच्या प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! 2 जानेवारी रोजी डेक्कन व डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द