नववर्षाचे भक्तांना चिंतामणीचे दर्शन झाले नाही

थेऊर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गुडीपाडव्याच्या सणावर मोठा परिणाम झाला असून अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या येथील श्री चिंतामणी मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविक यापासून वंचित राहिले.

विक्रम सवत्सर अर्थात हिंदू नववर्षाच्या दिवशी घरोघरी गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो हे हिंदू मान्यतेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे अनेक नवीन उपक्रम सुरू केले जातात अनेक जण नवीन वाहन खरेदी करून येथे पूजा करण्यासाठी आणतात प्रतिवर्षी नवीन वाहन पूजनासाठी रांगा लागत परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही वाहन पुजले गेले नाही.

आज पहाटे पाच वाजता चिंतामणीचे पुजारी सुधीर आगलावे यांनी विधिवत महापूजा केली तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीनेही महापूजा करण्यात आली श्री चिंतामणीस भरजरी पोशाख घालण्यात आला होता. मंदिराचे पुजारी यांनी सांगितले की, श्री चिंतामणी बाप्पाला प्रार्थना करून या कोरोना महामारीतून सर्व लवकर बाहेर काढ अशी प्रार्थना केली व आपण यावर मात करू अशी आशा व्यक्त केली.